Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शांत बसा नाहीतर शहर सोडून जा, अशी अद्दल घडवेल की सात जन्म...; अमितेश कुमार आले अँक्शन मोडवर

पुण्यात आज मुद्देमाल वितरण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार वेगळ्याच मूडमध्ये दिसले. सुरुवातीला त्यांनी पुण्यातील चारही परिमंडलातील अधिकाऱ्यांना कामाच्या सूचना दिल्या व त्यानंतर थेट गुंडाना दमच भरला. माझ्या कार्यक्षेत्रात एकतर शांत बसा नाहीतर, हे शहर सोडून जा, असा इशारा त्यांनी पुण्यातील भाईंना दिला. डॅशींग अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या अमितेश कुमारांच्या या धमकीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

Amitesh Kumar

अमितेश कुमारांची दहशत

अमितेश कुमार यांनी जेव्हा पोलिस आयुक्त म्हणून पुण्याचा पदभार स्विकारला होता तेव्हा त्यांनी रेकाँर्डवर असणाऱ्या सगळ्याच गुन्हेगारांची ओळख परेड घेतली होती. या परेडची राज्यभर चर्चा झाली. या परेडमध्येच त्यांनी आपल्या कामाची पद्धत दाखवून दिली होती. त्यानंतर पुण्यातील गुन्हेगारी काही प्रमाणात अटोक्यात आली. मात्र खंडणी, दरोडेखोरी, दहशत यासारखे गुन्हे अजूनही काही ठिकाणी घडताना दिसत आहेत. अमितेश कुमार यांचा आक्रमक पवित्रा आता पुन्हा दिसू लागला आहे.

भाईंना दिला थेट इशारा

अमितेश कुमार यांनी आज आपल्या स्टाईलने अधिकाऱ्यांना समजावले. ते म्हणाले, पोलिस ठाण्यात चोरीचा माल जप्त केला असेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन तो परत करा. बेवारस वाहने आढळली तर चौकशी करा. चोरीच्या घटनांना आळा घाला. गुन्हेगारांवर वाँच ठेवा, अशा सुचना त्यांनी चारही परिमंडलातील अधिकाऱ्यांना दिल्या. गुन्हेगारांनाही त्यांनी आपल्या स्टाईलने दम दिला. ते म्हणाले, खंडणीच्या माध्यमातून दहशत निर्माण करणारे आणि सर्वसामान्य जनतेची लुटमार करणाऱ्या गुन्हेगारांना सात जन्म लक्षात राहील, अशी कारवाई करु.

मस्ती खपवून घेणार नाही

अमितेश कुमार म्हणाले, जर कोणी खंडणी मागून पैसे कमावत असेल, बळाचा वापर करुन घर खाली करायला सांगत असेल, तर त्याला माझं शेवटचं सांगणं आहे, हे शहर सोडून जा. एकतर शांत रहा नाहीतर येथून बाहेर पडा. अन्यथा अशी कारवाई करेल की, सात जन्म लक्षात राहील. अवैध धंद्याच्या माध्यमातून ज्यांना पैसे कमावण्याची मस्ती आली आहे, त्यानं मी ही थेट सूचना देतोय. कोणाचीही मस्ती खपवून घेतली जाणार नाही, असा दम त्यांनी आज भरला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+