पुणे मेट्रोचा विस्तार: PCMC ते भक्ती-शक्ती मार्गावर पहिला टप्पा पूर्ण! कोणती आहेत स्थानके? वाचा
Pune Metro News : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंतच्या पुणे मेट्रोच्या फेज-२ च्या कामाचा पहिला टप्पा बुधवारी पूर्ण झाला. पिंपरी चिंचवड आणि अकुर्डी स्थानकांदरम्यान खंडोबा चौकात सेगमेंट लॉन्चिंग गर्डर बसविण्यात आले. हा मार्ग सध्या कार्यरत असलेल्या वनाज-रामवाडी आणि PCMC-स्वारगेट या लाईनचा विस्तार आहे. या मार्गाचा पिंपरी चिंचवडकरांना फायदा होणार आहे.
कसा आहे पहिला टप्पा?
पुणे मेट्रोच्या PCMC ते भक्ती-शक्ती चौक या विस्तारित मार्गाचा पहिला टप्पा 23 एप्रिलला पूर्ण झाला. खंडोबा माल चौकात सेगमेंट लॉन्चिंग गर्डर बसविण्यात आले. जिथे एकूण 12 सेगमेंट्सपैकी 4 सेगमेंट्स लावण्यात आले. उर्वरित 8 सेगमेंट्सचे काम प्रगतीपथावर आहे. हा मार्ग एकूण 151 पिअर्स आणि 1,337 सेगमेंट्सचा असेल. ज्यापैकी 517 सेगमेंट्स आधीच तयार करण्यात आले आहेत. या मार्गाचे बांधकाम 6 जुलै 2024 ला सुरू झाले होते.

महा- मेट्रोचे म्हणणे काय?
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) चे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर म्हणाले की. "PCMC ते निगडी मार्गावर पहिल्या स्पॅनचे बांधकाम सुरू झाले आहे. ही खूप आनंदाची बाब आहे. हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असे त्यांनी सांगितले. हा विस्तार पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांसाठी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे, ज्यामुळे त्यांना पुण्याच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागांशी जोडला जाणार आहे.
नव्या मार्गावर कोणती स्थानके?
1. चिंचवड स्थानक: हे स्थानक जवळील रहिवासी वसाहती, व्यावसायिक क्षेत्रे आणि चिंचवड रेल्वे स्थानकाला जोडेल. यामुळे स्थानिक रहिवाशांना आणि रेल्वे प्रवाशांना मेट्रो सुविधा मिळेल.
2. अकुर्डी स्थानक: हे स्थानक शैक्षणिक, रहिवासी आणि औद्योगिक क्षेत्रांना सेवा देईल. अकुर्डी परिसरातील विद्यार्थी आणि कामगारांना याचा विशेष फायदा होईल.
3. निगडी स्थानक: हे स्थानक रहिवासी आणि मनोरंजनाच्या ठिकाणांना जोडेल, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांचा प्रवास सुलभ होईल.
4. भक्ती-शक्ती स्थानक: हे स्थानक धार्मिक आणि मनोरंजन केंद्रांना जोडेल, तसेच PMPML बस डेपोशी जोडणी करेल, जे देहू, चिखली, तळेगाव आणि वडगांवसारख्या बाह्य क्षेत्रांना जोडते.












Click it and Unblock the Notifications