Andekar Gang Pune : नाना पेठेतील टोळीयुद्ध निवडणुकीच्या मैदानात? आंदेकर कुटुंबीयांना सर्शत परवानगी
शहरातील नाना पेठ भागात वर्चस्वाच्या वादातून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आंदेकर टोळीतील (Andekar Gang Pune) सदस्यांना पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika Election) निवडणुकीचे वेध लागले आहेत. टोळीचा मोरक्या बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या कुटुंबातील दोन महिलांना निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त हिरवा कंदील दाखवला आहे.

राजकीय वळण आणि न्यायालयीन निर्णय
नाना पेठेतील 'आयुष कोमकर' हत्या प्रकरणामुळे सध्या आंदेकर कुटुंबातील प्रमुख सदस्य तुरुंगात आहेत. मात्र, लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचे नमूद करत, विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी त्यांना अर्ज भरण्याची परवानगी दिली.
यांना मिळाली परवानगी
- बंडू आंदेकर (टोळी प्रमुख)
- लक्ष्मी उदयकांत आंदेकर (भावजय)
- सोनाली वनराज आंदेकर (सून)
कडक अटी आणि पोलिसांचा पहारा
न्यायालयाने अर्ज भरण्यास परवानगी दिली असली तरी, त्यावर अत्यंत कडक निर्बंध लादले आहेत. आरोपींना आज (शनिवार, २७ डिसेंबर) कडक पोलीस बंदोबस्तात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेले जाईल. अर्जासाठी लागणारा पोलीस बंदोबस्ताचा खर्च स्वतः अर्जदारांना (आरोपींना) करावा लागणार आहे.
काय आहेत न्यायालयाचे निर्बंध?
- अर्ज भरताना कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही.
- प्रचार यात्रा किंवा शक्तिप्रदर्शनावर पूर्णपणे बंदी.
- सार्वजनिक ठिकाणी भाषण करण्यास मनाई.
- समर्थकांना घोषणाबाजी करता येणार नाही.
पार्श्वभूमी काय आहे?
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी नाना पेठेत आयुष कोमकर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हे हत्याकांड घडल्याचा आरोप पोलिसांचा आहे. याच प्रकरणात सध्या बंडू आंदेकर आणि त्याचे कुटुंबीय तुरुंगात आहेत. याव्यतिरिक्त, बंडू आंदेकर याला जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी धुळे कारागृहातून ताब्यात घेऊन अटक केली होती.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर असून, आंदेकर कुटुंबीयांच्या या उमेदवारीमुळे नाना पेठेतील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.












Click it and Unblock the Notifications