Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर बलात्कार; नेमका कसा घडला प्रसंग, सीसीटीव्हीतून आरोपीची पटली ओळख

Pune Swargate Bus Station Rape On Girl Crime Update : पुण्यातील स्वारगेट बसस्टँड परिसरात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जात होती. ती बुधवारी पहाटे स्वारगेट बसस्थानकावर थांबली होती. तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबल्याचे सांगितले. पण तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यावर तरुणाने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले. त्यानंतर तो तिला जवळच उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला व तेथून पळ काढला.

Pune Swargate Bus Station Rape

स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा

या घटनेमुळे हादरलेल्या तरुणीने आपल्या मित्राला फोनवरून ही घटना सांगितली. त्यानंतर मित्राने तिला तत्काळ पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तरुणीने स्वारगेट पोलिस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. या घटनेची वाच्यता होताच पुण्यात एकच खळबळ माजली.

आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार

पोलिसांनी स्वारगेट बस स्थानक परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपीची ओळख पटवली आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर शिक्रापूर व शिरूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. सध्या तो फरार आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे पथक त्याच्या मागावर निघाले असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वारगेट बसस्थानक शहरातील एक सुरक्षित बसस्थानक समजले जाते. तिथे 24 तास प्रवाशांची वर्दळ सुरू असते. त्यानंतरही तिथे ही घटना घडल्यामुळे महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कोण आहे आरोपी दत्तात्रय गाडे?

प्रस्तुत प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा एक सराईत गुन्हेगार आहे. तो मूळचा शिरूरचा आहे. त्याच्यावर शिक्रापूर व शिरूर पोलिस ठाण्यात चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे नोंद आहेत. त्याने स्वारगेट बसस्थानकावर तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाहीमध्ये नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असलला तरी स्वारगेट बसस्टँडसारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेली ही घटना कुणालाच कशी कळली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. गंभीर गोष्ट म्हणजे बलात्कार झाल्यानंतरही पुण्यात त्या तरुणीची कुणीही मदत केली नसल्याचा दावाही या प्रकरणी केला जात आहे. यामुळे समाजाच्या मानसिकतेवरही सवाल उपस्थित होत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+