Pune Crime News : महाराष्ट्रात पुन्हा हादरला! धावत्या स्कूल बसमध्ये 6 वर्षांच्या मुलींसोबत अत्याचार!
Pune Crime News : बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत चिमुरड्यांवर अत्याचार झाला होता. या प्रकरणातील आरोपीचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. हे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातही असाच धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले. धावत्या स्कूल बसमध्ये दोन सहा वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घृणास्पद घटना समोर आली. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वानवाडी येथील घटना
पुण्यात चालत्या स्कूल बसमध्ये बस चालकाने दोन अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. पुण्यातील वानवडी परिसरातील धकादायक प्रकार घडलाय. अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण
बस चालकाने सहा वर्ष चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर मागील चार दिवसांपासून चालत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार करीत होता. आरोपी हा एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडण्याचे काम करतो. या आरोपीच्या बसमध्ये दोन्ही पीडित चिमुरडी पुढच्या सीटवर बसत होत्या.
आरोपी चालवत असलेल्या बसमध्ये दोन्ही चिमुरडींना जवळ बसून त्यांच्यासोबत लैंगिक अश्लील चाळे करत होता. या विषयाची वाचता कुठे केला तर धमकीसुद्धा देत असल्याची माहिती समोर आलीय. अल्पवयीन चिमुरडी घरी आल्यानंतर तिला प्रायव्हेटच्या जागी वेदना होत होत्या.
यानंतर मुलीच्या आईने याची विचारपूस केल्यानंतर आरोपीने केलेला दुष्कर्म अल्पवयीन चिमुरडीने आईला सांगितलं. यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने मुलीचे पालकही हादरले आहेत. दरम्यान या घटनेप्रकरणी आता कार्यवाही केली जात आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पुण्यात स्कूलव्हॅनमध्ये एका चालकाने मुलींना टच केले आहे. चुकीच्या ठिकाणी टच केले आहे. एका मुलीच्या पालकांनी ज्याप्रकारे अशाप्रकारे एफआयआर दिला. त्यानुसार इतर मुलींची चौकशीही करण्यात आली त्यात अजून एका मुलीला त्या आरोपीने अशाच प्रकारे टच केले आहे हे समोर आले आहे. त्यामुळे या संशयितावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्या प्रकरणात कडक कारवाई केली जात आहे.
या प्रकरणात संस्थाचालकांनाही बोलवण्यात आले आहे. त्यांचा काही त्यात दोष आहे का हेही तपासण्यात येईल. सर्व संस्थांना सांगण्यात येत आहे की, चालक आणि इतर स्टाफ योग्य आहे की नाही हे बघावे असे सांगण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे स्कूलबसमध्ये मुली पाठवताना फार काळजी वाटत असल्याची प्रतिक्रीया काही पालकांनी या घटनेनंतर दिली आहे.












Click it and Unblock the Notifications