Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी अजून पसारच! एवढ्या लाखांचं बक्षीस जाहीर, वाचा
Pune Bus Rape Case : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पुणे पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरु आहे. त्यासाठी 8 पथकं स्थापन केली आहेत. पण अजूनही आरोपी हाती लागलेला नाही. आता पोलिसांनी संशयित आरोपीला पकडण्यासाठी 1 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान आज गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेत स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणात एक खुलासा केला आहे. त्यानुसार, या प्रकरणात पोलिसांची काहीही चूक नाही, त्यांनी त्यांचे काम योग्य पद्धतीने हाताळले. प्रकरणात गुप्तता महत्वाची असल्याने हे प्रकरण लवकर कुणी कळू दिली नाही दुसरी गोष्ट अशी की, एसटी महामंडळाने खासगी सुरक्षा पुरवली असून त्यांच्याकडून बसस्थानकात सुरक्षेत चूक झाल्याचा ठपका मंत्री कदम यांनी ठेवला.

काय आहे बलात्काराची घटना?
पुण्यात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे लोकांच्या मनात रोष, संताप आहे. सोमवारी सकाळी 5.30 च्या सुमारास स्वारगेट एसटी डेपो परिसरात ही घटना घडली. पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानक परिसरात फलटणला जाणाऱ्या बससाठी थांबली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला. गोड बोलून त्याने ओळख करुन घेतली. कुठे जाता म्हणून त्याने मुलीला विचारलं. मुलीने तिला फलटणला जायच असल्याच सांगितलं. त्यावर आरोपीने सातारची बस इथे लागत नाही असं सांगितलं. तो तरुणीला बस कुठे लागते ते दाखवण्याच्या बहाण्याने तिला घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला.
एक लाखांचे बक्षीस जाहीर
पुणे पोलिसांनी संशयित आरोपीची माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांच इनाम जाहीर केले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आणि तरुणीने दिलेल्या माहितीवरुन आरोपीची ओळख पटवली आहे. संशयिताचे नाव दत्तात्रय रामदास गाडे आहे. मंत्री योगेश कदम यांच्या सांगण्यांनुसार, संशयित आरोपीवर छोटे मोठे काही गुन्हे ग्रामीण भागात नोंद आहेत.
कोण आहे आरोपी दत्तात्रय गाडे?
प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा एक सराईत गुन्हेगार आहे. तो मूळचा शिरूरचा आहे. त्याच्यावर शिक्रापूर व शिरूर पोलिस ठाण्यात चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे नोंद आहेत. त्याने स्वारगेट बसस्थानकावर तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाहीमध्ये नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असलला तरी स्वारगेट बसस्टँडसारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेली ही घटना कुणालाच कशी कळली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. गंभीर गोष्ट म्हणजे बलात्कार झाल्यानंतरही पुण्यात त्या तरुणीची कुणीही मदत केली नसल्याचा दावाही या प्रकरणी केला जात आहे. यामुळे समाजाच्या मानसिकतेवरही सवाल उपस्थित होत आहे.












Click it and Unblock the Notifications