Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Pune Crime News : धक्कादायक, पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार!

Pune Crime News : संस्कृतीचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक गंभीर आणि तेवढीच धक्कादायक घटना घडली आहे. वदर्ळ असलेल्या स्वारगेट एसटी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली, त्यावेळी ही घटना घडली. या घटनेने पुण्यात संताप व्यक्त होत आहे.

पुण्यात कोयता गँग, खूनसत्र आणि छेडछाडीच्या घटनानंतर आता महिला सुरक्षेचा प्रश्न उफाळून आला आहे. या अत्याचाराच्या घटनांनी पुणे खरंच सुरक्षित आहे का? हा सवाल उत्पन्न होत आहे.

Pune Crime News

संशयित आरोपींवर गुन्हा

घडलेल्या घटनेनंतर महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीची ओळख पटली आहे. या प्रकरणी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

काय घडला प्रकार?

पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जात होती. ती पुण्यात स्वारगेट एसटी डेपो परिसरात असताना एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसरीकडे थांबली असल्याचे सांगतिले आणि ती एकटी असल्याचे पाहून तिला डेपो परिसरातच उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसच्या दिशेने नेले.संशयित आरोपीने तिला आत जाण्यास सांगितलं. तरुणी बसमध्ये चढताच आरोपी लगेच तिच्या मागोमाग बसमध्ये घुसला. त्याने तिथे तरुणीवर बलात्कार केला , यानंतर तरुणीने कशीबशी आपली सुटका करुन पोलिस ठाण्यात धाव घेतली.

संशयितांचा शोध सुरु

रेप प्रकरणातील संशयितांचा शोध पोलिस कसून घेत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी आठ पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे आणि त्याची चौकशीही सुरु झाली आहे.
उपचारासाठी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सीसीटीव्हीद्वारे शोध सुरु

स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पीडित महिलेने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना कथन केला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे. पीडित तरुणीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+