Pune Crime News : पुण्यात महिला कंडक्टरचा आत्मदहनाचा प्रयत्न! शरीरसुखाची मागणी पूर्ण न केल्याने छळ?
Pune Crime News : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली असून महानगर परिवहन महामंडळात (PMPL) काम करणाऱ्या एका महिला बस कंडक्टरने स्वःतला आत्मदहनाचा प्रयत्न केला. डेप्युटी चीफ मॅनेजर यांच्या कार्यालयातच हा आत्महत्येचा प्रयत्न झाला.
या घटनेशी संबंधित धक्कादायक गोष्ट अशी की, संबंधित अधिकाऱ्याने शारिरीक सुखाची मागणी केली आणि त्याला नकार दिला म्हणून निलंबित करण्यात आल्याचा आरोपही महिला कंडक्टरने केला होता. आता हा प्रकार घडल्याने या घटनेची तीव्रता समोर आली आहे.

Pune Crime News : अशी घडली घटना
'मुंबई तक'च्या वृत्तानुसार आणि माहितीनुसार, कथितरित्या झालेल्या छळाला आणि त्यानंतर झालेल्या निलंबनाच्या कारवामुळे अस्वस्थ झालेल्या महिलेने संबंधित अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतला. पण तिथे उपस्थित असलेल्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.
तक्रारीची दखल न घेतल्याने आत्मदहनाचा प्रयत्न!
संबंधित महिला वाहकाने महिला आयोगात धाव घेतली असून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिला वाहकाचा दावा आहे की, वरिष्ठांकडेही याप्रकरणी वेळोवेळी तक्रार दाखल केली आहे, मात्र त्याची दखल घेत जात नसल्याने महिला वाहकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पीएमपीएलच्या वरिष्ठांकडे डेपो मॅनेजरविरोधात तक्रार केल्यानंतर मॅनेजरने महिला कर्मचारीला निलंबित केल्याची माहिती आहे.
Pune Crime News : काय आहे महिला वाहकाची तक्रार?
महिला वाहकाने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित डेपो मॅनेजर हा त्यांना अनेक वर्षांपासून ड्युटीवर असताना डेपो मॅनेजर वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत होता. कधी कठिण ड्युटी लावणे, उशिरा सुटणाऱ्या गाड्या देणे, पाठलाग करणे, शरीर सुखाची मागणी करणे आदी त्रास दिला जात असल्याचे महिला कर्मचाऱ्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications