Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुणे हादरलं..! आधी प्रेयसीवर सपासप वार, मग प्रियकराची आत्महत्या; पहा नेमकं काय घडलं

पिंपरी- चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली. लाँजवर नेलेल्या प्रेयसीवर सपासप वार करुन नंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, पोलिस तातडीने घडनास्थळी गेल्यानंतर अंत्यवस्थ अवस्थेतील प्रेयसीला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नितेश नरेश मिनेकर (वय- 34, रा. येरवडा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाच नाव आहे. तर त्याच्यासोबतच्या 28 वर्षीय तरुणीवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

भांडणानंतर प्रेयसीवर केले वार

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार प्रेमप्रकरणातून झाला असावा, असा अंदाज आहे. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास हे दोघे खराळवाडी येथील राज प्लाझा येथे आले होते. त्यांनी त्या ठिकाणी रूम बुक केली. मात्र काही मिनिटांत त्यांच्यात जोरदार भांडण झाले. हे ऐकून हॉटेल व्यवस्थापकाने 112 नंबर वर फोन करून पोलिसांना बोलून घेतलं.

Pune Crime News

पोलीस हॉटेलमध्ये आले. त्यांनी त्या दोघांच्या रूमचा दरवाजा ठोठावला. आतून नितेशने कपडे घालत आहे. दरवाजा उघडतो, असं उत्तर दिलं. परंतु, त्यानंतर बराच वेळ दरवाजा उघडत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा, 28 वर्षीय तरुणी रक्ताच्या थारोळ्यात तर नितेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचा अंदाज पिंपरी पोलिसांनी वर्तवला आहे.

घटनेचा इतिहास कॅमेऱ्यात कैद

नितेश मिनेकर हा आपल्या प्रेयसी सोबत लॉजमध्ये जात असतानाची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. लॉजमध्ये गेल्यानंतर काही वेळाने नितेश मिरेकर याने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. घटनेत तरुणी गंभीर जखमी प्रकृती चिंताजनक आहे. तरुणीवर महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+