विरोधी पक्षाच्या नावाने गडकरींचा PM पदावर दावा, मोदींना संदेश देत डाव टाकला - प्रियांका चतुर्वेदी

Priyanka Chaturvedi on Nitin Gadkari : भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुरात बोलताना मोठे विधान केले. मला इंडिया आघाडी वाल्यांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला.

या विधानानंतर देशभरात चर्चा रंगल्या आहेत. यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या तथा राज्यसभा खासदार यांनी गडकरी व मोदींवर निशाणा साधला. तर आम्हाला पीएम पदासाठी भाजप नेत्याची गरज पडणार नाही, असा टोला लगावला. तर गडकरी यांनी थेट मोदींनाच संदेश दिलेला आहे, असा खोचक टोला हाणला.

Priyanka-Nitin

काय म्हणाले होते नितीन गडकरी?

नितीन गडकरी यांनी नागपूरमधील पत्रकारांच्या या कार्यक्रमात त्यांना मिळालेल्या ऑफर बाबत गौप्यस्फोट केला. आपल्या नेहमीच्या दिलखुलास शैलीत राजकीय फटकेबाजी त्यांनी केली. गडकरी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी एक घटना अचानक घडली. मी या घटनेमधील नेत्याचे नाव सांगणार नाही. पण त्यांनी मला सांगितले की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ.

पण त्यावर मी त्यांना विचारलं की, तुम्ही मला पंतप्रधानपदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी तो पाठिंबा का घ्यावा? मी संबंधित नेत्याला स्पष्टपणे सांगितले की, पंतप्रधान होणे हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी या तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे, असे विधान गडकरी यांनी केले.

आम्हाला नेता उसना घेण्याची गरज नाही - चतुर्वेदी

नितीन गडकरी यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्यावर आता विरोधकांकडून उत्तर दिले जात आहे. ठाकरे गटाच्या नेत्या तथा राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट करून गडकरींच्या विधानावर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, नितीन गडकरी यांनी त्यांच्या मनातील सर्वोच्च पदावर बसण्याची इच्छा बोलून दाखवली.

हे सांगताना नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षातील नेत्याकडून आपल्याला पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आल्याचे सांगितले. पण हा नितीन गडकरी यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेला थेट संदेश आहे. इंडिया आघाडीत देशाचे नेतृत्त्व करण्यासाठी अनेक सक्षम नेते आहेत. त्यामुळे आम्हाला पंतप्रधानपदासाठी भाजपमधून कोणत्याही नेता उसना घ्यावा लागणार नाही. मात्र, नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षाच्या नावाने पंतप्रधानपदावर दावा सांगून अगदी योग्य खेळी खेळली आहे, असे प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+