तगडा बंदोबस्त पण वकीलानं अखेर प्रशांत कोरटकराला हाताखालून काढलंच; कोल्हापूरच्या कोर्टात काय घडलं!
prashant koratkar news : पोलिस बंदोबस्तात कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या प्रशांत कोरटकरवर अखेर हल्ला झालाच. न्यायालयीन परिसरातच वकिलानेच प्रशांत कोरटकरला पोलीस बंदोबस्तात असताना मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओतून दिसून येत आहे की, पोलिसांनी वेळीच वकिलांना आवरल्याने मोठा अनर्थ टळला. कोर्टामध्ये युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर वकील अमित कुमार भोसले आले. ते या ठिकाणी कोर्टामध्येच आले होते. त्यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ये पश्या... म्हणत ते कोरटकरच्या दिशेने धावले असता पोलिसांनी तात्काळ त्यांना धरुन बाजुला केल्याचे व्हिडिओत दिसून येते.

कोल्हापूर न्यायालयात सुनावणी!
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटरला आज पुन्हा एकदा कोल्हापूरच्या सत्र न्यायलयात हजर करण्यात आले होते. यावेळी, दोन्ही बाजुंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. यापूर्वी न्यायालयाने कोरटकरला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे, आता 30 मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलिसांच्या कोठडीत असणार आहे.
या कारणामुळे कोठडीची केली मागणी
कोरटकरला पळून जाण्यासाठी कुणी-कुणी मदत केली, ऑनलाइन पेमेंट कोणी दिलं, यासह आणखी तपास बाकी असल्याने पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकीलांच्या बाजूने करण्यात आली होती.
न्यायाधीश एस.एस. तट यांच्यासमोर दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. त्यानुसार, आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.
सरकारी पक्षातर्फे अॅड.सूर्यकांत पोवार तसेच, इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे वकील असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले होते. तर, प्रशांत कोरटकर याच्यातर्फे वकील सौरभ घाग हे प्रत्यक्ष उपस्थित होते.












Click it and Unblock the Notifications