भाजपचा बच्चू कडूंना 'दे धक्का', प्रहारच्या बड्या नेत्याचा BJPत प्रवेश, विदर्भातील राजकीय गणित बदलणार
भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रहारचे प्रमुख तथा तिसऱ्या आघाडीचे नेते आमदार बच्चू कडू यांना जोरदार धक्का दिला आहे. एकीकडे बच्चू कडू हे भाजपला थेट मैदानात आव्हान देत असताना दुसरीकडे भाजपनेच बच्चू कडू यांना अडचणीत आणण्याचा डाव आखला.
बच्चू कडू यांची संघटना असलेल्या प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी भाजपात आज प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अनिल गावंडे यांनी भाजपात प्रवेश केल्याने आता अकोला, अमरावती तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपला मोठा फायदा होणार आहे. एकीकडे बच्चू कडू हे तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करित असले तरी त्यांच्या साथीदारांनी भाजपची साथ देणे योग्य केल्याने आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करत आहोत, गावंडे हे भाजप व महायुतीच्या उमेदवारांसाठी काम करतील, असा मला विश्वास आहे.
शिंदेंनी आमदार फोडला...
2019 मध्ये प्रहारचे दोन आमदार निवडून आले होते. त्यात अचलपूर येथून बच्चू कडू आणि मेळघाटमधून राजकुमार पटेल यांचा समावेश होता. बच्चू कडू यांनी सुरूवातील महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले होते. पण, बच्चू कडू यांनी महायुतीतून बाहेर पडत 'महाशक्ती परिवर्तन' आघाडीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं थेट बच्चू कडू यांचा आमदार अर्थात राजकुमार पटेल यांना गळाला लावत पक्षात प्रवेश करून घेतला.












Click it and Unblock the Notifications