मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही"; प्रफुल्ल पटेलांची ठाम भूमिका; विलीनीकरणास दिला पूर्णविराम!

Praful Patel NCP Statement : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या नेतृत्वबदल आणि विलीनीकरणाच्या चर्चांवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी, "मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही" असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या संभ्रम, अफवा आणि राजकीय चर्चांवर त्यांनी आज थेट भाष्य केले.

Praful Patel NCP Statement

अध्यक्षपदाची शर्यत नाही, जबाबदारीची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयात आज दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनानंतर 'कोण? काय? कसे? कुठे?' हे पाहण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही, हे पूर्णपणे स्पष्ट आहे.

एका केंद्रीय मंत्र्याने चुकून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आपल्या नावाचा उल्लेख केल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, नंतर संबंधित मंत्र्याने त्याबाबत खेदही व्यक्त केला. "मी पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. त्यामुळे अध्यक्षपद किंवा विधीमंडळाशी संबंधित सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे," असेही त्यांनी नमूद केले.

सुनेत्रा पवार यांच्याबाबतचा निर्णय कसा झाला?

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करून आपण सुनेत्रा पवार यांच्या घरी गेलो होतो, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. "पार्थ आणि जय पवार ही दोन्ही मुले तिथे होती. आम्ही त्यांचे सांत्वन केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे, ही भावना व्यक्त केली. जनतेचीही तीच भावना आहे की, त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी. सुनेत्राताईंनी आमच्या विनंतीला मान दिला," असे त्यांनी सांगितले.

पक्षात उलटसुलट चर्चा, पण निर्णय योग्यच

पक्षाच्या अंतर्गत चर्चांबाबत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, "आम्ही एक पक्ष आहोत, पण त्याचे दोन भाग आहेत - एक विधीमंडळ आणि दुसरा राजकीय पक्ष. विधीमंडळाचा विषय मार्गी लागला आहे. आता राजकीय पक्षासंबंधी निर्णय घ्यायचा आहे." मात्र, पक्षाशी कोणताही संबंध नसलेले लोक आणि काही माध्यमे उगाचच वादळ निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. "आमच्या बद्दल किंवा आमच्या पार्श्वभूमीविषयी कोणीही टिप्पणी करत असेल, तर त्याला लाज वाटली पाहिजे. मी महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी आहे," असे ते म्हणाले.

"मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही" - पुन्हा ठाम पुनरुच्चार

पत्रकारांनी थेट प्रश्न विचारल्यानंतरही प्रफुल्ल पटेल यांनी आपली भूमिका अधिक ठामपणे मांडली. "पक्षाचा निर्णय योग्य व्यक्तीचाच होईल आणि तो माझ्याशिवायच होईल. मी कोणत्याही शर्यतीत नाही. आमच्याकडून एकही विधान न आले असताना संशय निर्माण करणे ही घाणेरडी गोष्ट आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांच्या पोस्टवरही टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पोस्टबाबत विचारले असता प्रफुल्ल पटेल म्हणाले, राज ठाकरे हे माझ्या पक्षाशी संबंधित आहेत का? आमचा अध्यक्ष कोण, विधीमंडळ नेता कोण, हे आम्ही ठरवणार. सकाळी 9 वाजताचे बुलेटिन किंवा कुणीही आम्हाला काय करायचे ते सांगू नये."

विलीनीकरणावर पूर्णविराम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट भूमिका घेतली."आज आमच्यापुढे विलीनीकरणाचा कोणताही प्रश्न नाही. सध्या आमच्यापुढे आमचा पक्ष, आमचे घर आणि आमचे विधीमंडळ हेच प्रश्न आहेत. ते निकाली निघाल्यानंतरच इतर विषयांवर विचार केला जाईल," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+