मी प्रेस घेतली तर खासदाराची चड्डीही... पोलिस अधिकाऱ्याच्या पोस्टमुळे खळबळ, वाचा नेमकं प्रकरण

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच गरम झाले आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी व एसआयटीकडे गेल्याने रोज नवे खुलासे समोर येत आहेत. काही दिवासांपूर्वी खा. बजरंग सोनवणे यांनी बीड पोलिसांवर ताशेरे ओढत, गंभीर आरोप केले होते. आता बीड जिल्ह्यातीलच एका पोलिस अधिकाऱ्याने थेट एका खासदाराला इशारा देणारी पोस्ट व्हायरल केल्याने पोलिस दलासह राजकारण्यांमध्येही खळबळ उडाली आहे.

Ganesh Munde

कुणी केली पोस्ट?

बीडमधील पत्रकारांनी पोलिस अधिकाऱ्यांना घेऊन एक व्हाट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये पोलिस अधीक्षकही आहेत. याच ग्रुपमधील पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांनी एका प्रश्नावर एक पोस्ट केली. मी पत्रकार परिषद घेतली तर या खासदाराची चड्डीही जागेवर राहणार नाही... अशी पोस्ट या पीआय गणेश मुंडे यांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली. या पोस्टनंतर काही पत्रकारांनी कोणता खासदार..? असे प्रश्न विचारले. त्यानंतर समझने वालों को इशारा कॉफी होता है... असंही पीआय मुंडे यांनी म्हटलं.

पोस्टनंतर उडाली खळबळ

या पोस्टनंतर पोलिस दल व राजकारण्यांमध्ये एकच खळबळ उडाली. पीआय गणेश मुंडे यांनी कोणत्याही खासदाराचे नाव घेतले नाही, मात्र तो खासदार बजरंग सोनवणेंच आहेत, अशी चर्चा सुरु झाली. चर्चा वाढल्यानंतर पीआय गणेश मुंडे यांना या ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. मात्र या प्रकाराची चर्चा चांगलीच रंगली. आज पुण्याच्या मोर्चातही याच पोस्टवर खा. बजरंग सोनवणे यांनी पीआयला प्रत्युत्तर दिले. माझी विनंती आहे, त्या अधिकाऱ्याने पत्रकार परिषद घ्यावीच... अशा थेट इशारा बजरंग सोनवणे यांनी दिला.

बजरंग सोनवणेंची पोस्ट काय?

बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांवर आरोप केले होते. त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे या अधिकार्‍यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली होती. त्या कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून अनेक गौप्यस्फोट होतील, असे त्यांचे म्हणणे होते. खा. सोनवणे यांच्या याच पोस्टवरुन आता पीआय मुंडे यांनी उत्तर दिले असल्याचे बोलले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+