Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विकसित खराडी-लोहगाव-वाघोलीसाठी भाजपच्या आठही उमेदवारांना विजयी करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

PMC Election 2026 : "ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्याची नसून, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ५५ जनहितकारी योजना प्रभाग क्रमांक ३ आणि ४ मध्ये पोहोचवण्याची निवडणूक आहे. विकसित पुणे, विकसित खराडी आणि विकसित लोहगावचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपच्या सर्व आठही उमेदवारांना बहुमताने निवडून द्या," असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

PMC Election 2026

चंदननगर परिसरात प्रभाग क्रमांक ३ आणि ४ मधील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रभाग ३ चे उमेदवार ऐश्वर्या पठारे, रामदास (रामभाऊ) दाभाडे, अनिल सातव, श्रेयस खांदवे आणि प्रभाग ४ चे उमेदवार सुरेंद्र बापूसाहेब पठारे, तृप्ती भरणे, रत्नमाला सातव व शैलजित बनसोडे उपस्थित होते.

सभेतील प्रमुख घोषणा आणि आश्वासने

प्रॉपर्टी कार्डचे वचन: "आठही नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांनी केवळ एक ठराव करावा, मी शब्द देतो की पुढच्या सहा महिन्यांत संपूर्ण लोहगाव-खराडी परिसरातील नागरिकांना सरकारकडून प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिले जाईल," असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. तसेच या भागातील घरांचे मॅपिंग नागरिकांकडून एकही पैसा न घेता केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाहतूक कोंडीतून मुक्ती

नगररोडवरील जटील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला सक्षमीकरण

महिला उमेदवारांना आवाहन करताना मंत्री महोदय म्हणाले की, "निवडून आल्यावर वडगाव शेरी आणि लोहगाव परिसरात २ हजार महिला बचत गट तयार करा. प्रत्येक गटाला १ लाख रुपये अनुदान देण्याची योजना आपण राबवू."

स्वस्त वीज आणि विकास आराखडा

संपूर्ण परिसरात केवळ ६ रुपयांत वीज देण्याचा निर्णय लवकरच होईल. तसेच वाघोली, लोहगाव आणि खराडीच्या विकासासाठी स्वतंत्र आराखडा मंजूर करून या भागाचा चेहरामोहरा बदलण्याची जबाबदारी आपली असल्याचे त्यांनी नमूद केले.

'ही १२४ योजनांची निवडणूक'

बावनकुळे यांनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितले की, ही निवडणूक एकूण १२४ विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'विकसित पुणे' हा संकल्प तळागाळापर्यंत नेण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. या सभेला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+