PM Kisan Yojana पीएम किसानबाबत मोठा नियम! 'या' 2 कागदपत्राशिवाय अडकतील 2000 रुपये; लगेच करा पुर्तता
PM Kisan 22nd Installment Update : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-KISAN) लाभार्थ्यांसाठी २०२६ वर्षाची सुरुवात एका मोठ्या बदलासह झाली आहे. केंद्र सरकारने योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी आता 'युनिक फार्मर आयडी' अनिवार्य करण्याची तयारी केली आहे.ज्या शेतकऱ्यांकडे ही डिजिटल ओळख नसेल, त्यांचा २२ वा हप्ता अडकण्याची शक्यता आहे.

फार्मर आयडीबाबतत "पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे! असंख्य शेतकरी २२ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, अशातच केंद्र सरकारने लागू केलेले नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. आता केवळ आधार कार्ड असून चालणार नाही, तर 'युनिक फार्मर आयडी' असल्याशिवाय तुमच्या खात्यात २,००० रुपये जमा होणार नाहीत. हा नवीन नियम नेमका काय आहे आणि घरी बसून फार्मर आयडी कसा मिळवायचा? वाचा हा सविस्तर रिपोर्ट..." यासंदर्भात माहिती जाणून वेळीच नमूद गोष्टीची पुर्तता केल्यास संभाव्य नुकसान टळू शकेल.
काय आहे 'डिजिटल फार्मर आयडी'?
जसे प्रत्येक नागरिकासाठी 'आधार कार्ड' महत्त्वाचे आहे, तसेच आता शेतकऱ्यांसाठी 'डिजिटल फार्मर आयडी' असेल. AgriStack च्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांचा एक सुरक्षित डेटाबेस तयार करत आहे. यामुळे खत, बियाणे, कृषी उपकरणे आणि पीक विम्याचा लाभ थेट आणि विनाविलंब मिळण्यास मदत होईल.
२२ व्या हप्त्यासाठी 'या' दोन गोष्टी अनिवार्य
१. युनिक फार्मर आयडी (Unique Farmer ID) शेतकऱ्यांची नवीन डिजिटल ओळख.
२. eKYC पूर्ण असणे : आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून पोर्टलवर ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
हप्ता कधी जमा होणार?
आतापर्यंत शेतकऱ्यांना २१ हप्ते यशस्वीरित्या मिळाले आहेत. २२ व्या हप्त्याची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही, परंतु जानेवारी २०२६ अखेरपर्यंत किंवा फेब्रुवारी २०२६ मध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
कसे तपासाल तुमचे नाव आणि स्टेटस?
- अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जा.
- 'Beneficiary Status' पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून 'Get Data' वर क्लिक करा.
- येथे तुम्हाला तुमची ई-केवायसी आणि फार्मर आयडीची स्थिती समजेल.












Click it and Unblock the Notifications