Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: ताब्यात घेताच PSI गोपाल बडणेची पहिली प्रतिक्रीया, म्हणाला- 'मी.'

Phaltan Doctor Suicide : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी, निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाल बडणे हा अखेर पोलिसांना शरण आला आहे. या घटनेनंतर तो फरार झाला होता आणि पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. या घटनेनंतर प्रसारमाध्यमाला बडणे याने प्रतिक्रीया देत आरोपांचे खंडन केले आहे.

शनिवारी २५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री उशिरा गोपाल बडणे याने स्वतःहून फलटण पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. पोलिसांनी त्याला त्वरित ताब्यात घेतले आहे.

Phaltan Doctor Suicide

गोपाल बडणेची आरोपावर पहिली प्रतिक्रिया

शरणागती पत्करताना पोलीस ठाण्याबाहेर आरोपी गोपाल बडणे याने प्रसारमाध्यमांना कोणतीही थेट आणि विस्तृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, उपस्थित माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर त्याने केवळ 'या प्रकरणात मी निर्दोष आहे, मी प्रामाणिक आहे. न्यायालय जो काही निर्णय देईल त्यावर माझा विश्वास आहे. माझा पोलिस प्रशासनावरही विश्वास आहे.' इतकीच प्रतिक्रिया दिली व मौन बाळगले, असे एबीपी माझाने वृत्त दिले आहे. संशयित आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून, लवकरच त्याची कसून चौकशी केली जाईल तसेच आज न्यायालयात त्याला हजर केले जाईल.

प्रकरण नेमके काय आहे?

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या २६ वर्षीय महिला डॉक्टरने नुकतीच आत्महत्या केली. या डॉक्टरने तिच्या हातावर आणि एका सुसाईड नोटमध्ये अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नोटनुसार, निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बडणे याने अनेक महिन्यांपासून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला, तसेच तिच्यावर चार वेळा बलात्कार केला असा सुसाईड नोटमध्ये उल्लेख असल्याचे सांगिले जात आहे.

डाॅक्टर महिलेच्या घरमालकाला अटक

प्रशांत बनकर नावाच्या दुसऱ्या आरोपीवरही (जो डॉक्टरचा घरमालक आहे) मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. त्याला पोलिसांनी यापूर्वीच पुण्यातून अटक केली आहे. पोलीस अधिकारी बडणे व इतरांकडून डॉक्टरवर रुग्णालयात तपासणीसाठी न आलेल्या व्यक्तींना 'फिटनेस सर्टिफिकेट'सारखे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव आणला जात होता असा आरोप आहे.

पुर्वीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष?

मृत डॉक्टरने या छळाबाबत यापूर्वीही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

घटनेचा सविस्तर घटनाक्रम

  • जून २०२५: पीडित डॉक्टरने डीएसपी यांना पत्र लिहून रुग्णालयातील गैरव्यवहार आणि तिच्यावर होत असलेल्या दबावाबाबत माहिती दिली होती.
  • आत्महत्या: अलीकडच्या काळात डॉक्टरने आत्महत्या केली. तिने आपल्या हातावर आणि सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे आणि बलात्काराचा उल्लेख केला.
  • गुन्हा दाखल: सुसाईड नोट आणि कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने निलंबित पीएसआय गोपाल बडणे आणि प्रशांत बनकर यांच्यावर बलात्कार आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
  • पहिली अटक: पोलिसांनी तातडीने आरोपी प्रशांत बनकर याला पुण्यातून अटक केली.
  • बडणे फरार: मुख्य आरोपी गोपाल बडणे घटनेनंतर फरार झाला. त्याला निलंबितही करण्यात आले.
  • हायकोर्टाची दखल: या गंभीर प्रकरणाची दखल झारखंड उच्च न्यायालयाने घेतली आणि राज्य आरोग्य सचिव तसेच जिल्हा सिव्हिल सर्जनकडून अहवाल मागवला.
  • बडणेची शरणागती : शनिवारी २५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री उशिरा फरार आरोपी गोपाल बडणे याने फलटण पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+