परळी: मरळवाडी सरपंचाच्या खून प्रकरणात शरद पवार गटाच्या बबन गीतेसह 5 जणांवर गुन्हा दाखल
बीड : परळी शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना रात्री घडली होती.याप्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गिते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडच्या परळी शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारामध्ये अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या गोळीबार प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह अन्य चार जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सरपंच बापू आंधळे यांची आर्थिक देवाण- घेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बबन गीते यांनी मृत बापू आंधळे यांना बोलावून घेत पैसे आणलेस का? अशी विचारणा करत गोळीबार केल्याचे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर परळीत दाखल
परळीत झालेल्या गोळीबारानंतर बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तत्काळ घटनास्थळी रात्री उशिरा भेट दिली. पोलिस अधीक्षक परळीत दाखल होताच तपासाला देखील गती दिली असून, आता संशयीत आरोपीच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.












Click it and Unblock the Notifications