Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

..यावेळी पंकजा मुंडे आमदार होतील का? मतदानापुर्वी सिद्धिविनायकाचे घेतले दर्शन

मुंबई - महाराष्ट्रातील चर्चेतील नेत्या म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडे या विधानपरिषदेची निवडणूक लढवत आहेत. त्यांना एप्रिल-मे 2024 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. 2019 मध्येही विधानसभा निवडणुकीत त्या पराभूत झाल्या होत्या. आता विधानपरिषद निवडणुकीत त्या आमदार होतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे.

पंकजा मुंडे सिद्धीविनायकाच्या चरणी

विधान परिषदेची आज निवडणूक होत आहे. सकाळपासून विधानभवनात मतदान प्रक्रीया सुरु आहे. पंकजा मुंडे यांनी विधान परिषद निवडणुकीनिमित्त विधान भवनाकडे जाण्यापूर्वी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले.

Pankaja Munde IN Siddhivinayak Temple

पंकजा मुंडेंसाठी विजय आवश्यक

आज विधानभवनात जाण्यापुर्वी पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियात एक पोस्ट केली. त्यात त्या मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेताना दिसत आहेत. याआधी पंकजा मुंडेंना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे सक्रीय राजकारणात राहण्यासाठी विधानपरिषद निवडणुकीत विजय त्यांच्यासाठी महत्वाचा आहे.

2019 मध्ये पंकजा मुंडेंचा पराभव

परळी विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यावेळी विजय प्राप्त करुन धनंजय मुंडे जायंट किलर ठरले होते. ही राज्यातील हायहोल्टेज लढत होती. साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.

धनंयज मुंडेंकडून पराभूत

पंकजा मुंडे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 91 हजार 32 मते पडली होती. तर त्यांचे चुलत बंधू आणि प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे यांना 1 लाख 31 हजार 555 इतकी मते पडली होती. त्यांनी पंकजा मुंडे यांचा 30 हजार 524 मतांनी पराभव केला होता.

धनंजय मुंडे -पंकजा मुंडे पुन्हा एकत्र

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे महायुतीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर नेते अजित पवार यांनी स्वतंत्र चुल मांडली. शरद पवार यांच्या पक्षातून जवळपास 40 आमदार फुटले त्यात धनंजय मुंडे हेही होते. अजित पवार गट महायुतीत आल्यानंतर सत्तेतही आला. भाजपच्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचे पक्ष वेगळे असले तरी ते आता मित्र पक्ष आहे. त्यामुळेच भाऊ आणि मित्रपक्षाचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना मोठी साथ दिली पण त्यांचा पराभव झाला.

लोकसभेत पंकजा मुंडेंचा पराभव

बीडमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे यांचा 6 हजार 585 मतांनी पराभव केला. बजरंग सोनवणे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून 66 हजार 940 मते मिळवली. तर पंकजा मुंडे यांना 1 लाख 41 हजार 774 एवढे मताधिक्य मिळाले. पण या याही निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता.

आता राजकीय पुर्नवसन

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचे तिकीट देऊन त्यांचे राजकीय पुर्नवसन करण्यात येत आहे. भाजपने याआधी त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतही सामिल करुन घेतले होते. पंकजा मुंडे या आता आमदार होतील का हा प्रश्न असला तरी त्यांच्या तमाम चाहत्यांना त्यांच्या विजयाचा विश्वास आहे.

पंकजा मुंडेंनी आज सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर एक पोस्ट लिहीली. त्यावर एका चाहत्याने श्री सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने आपला विजय निश्चित आहे. माझ्या देखील शुभकामना आणि आशीर्वाद आहेत अशी प्रतिक्रीया दिली तर विजयी भव अशा अनेक प्रतिक्रीया त्यांच्या पोस्टवर आल्या आहेत.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+