Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाचोर्‍यात भाऊ विरुद्ध बहीण लढत! आमदार किशोर पाटील यांना वैशाली सूर्यवंशींचे आव्हान, पण कोण जिंकणार?

Pachora Assembly Election 2024 : जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या स्मिता वाघ यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे या महायुतीचा आत्मविश्वास वाढला. विधानसभा निवडणुकीसाठी पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार किशोर पाटील यांची विजयाची हॅटट्रिक होणार का हेच सर्वजण आता विचारत आहे. कारण त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून त्यांच्याच भगिनी वैशाली सूर्यवंशी या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाऊ विरुद्ध बहीण असा सामना रंगत आहे.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर त्याच्या समवेत किशोर पाटील देखील शिंदे गटात सहभागी झाल्याने पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मोठे खिंडार पडले. किशोर आप्पा यांच्या पाठोपाठ अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात गेले. शिंदे गट महायुतीत सहभागी झाला.‌ पाठोपाठ अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 75 टक्के राष्ट्रवादी काँग्रेसही महायुतीत सहभाग झाली. त्यामुळे आता महायुतीत मुंबईपासून पाचोर्‍यापर्यंत तीन वाटेकरी झाले आहेत. परंतु, पाचोर्‍याचा विचार केला तर तिघांची तोंड तीन दिशेला असल्याचे दिसते.

Pachora Assembly Election 2024 Fight between Kishore Patil and Vaishali Suryavanshi

वैशाली सूर्यवंशी यांचे आव्हान

आमदार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. त्याचे तीव्र पडसाद या मतदारसंघात उमटले होते.. विशेषतः त्यांच्या कुटुंबातूनच या कृतीला मोठा विरोध झाला. त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनीच त्यांना पहिले आव्हान दिले‌ होते. वैशालीताई यांनी महाविकास आघाडीकडून तयारी केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाचोरा येथे सभा घेतली. या दौऱ्यातही वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवार म्हणूनच प्रोजेक्ट करण्यात आले होते. सबंध मतदारसंघात श्रीमती सूर्यवंशी यांनी जोरदार बांधणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत त्याची चुणूक दिसून आली. त्यामुळे आता महायुतीचे आमदार किशोर पाटील विरुद्ध महाविकास आघाडीच्या सूर्यवंशी अशी लढत आहे.

निधी आणला, पण डोकेदुखी वाढली

आमदार पाटील यांनी मतदार संघाच्या विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला. पण, मित्र पक्षातील नेते बंडखोरीच्या तयारीत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. या मतदारसंघात विकास कामांऐवजी सुखदुःख प्रसंगी कोण भेटी घेतो, लग्न कार्यात कोण जास्त हजेरी लावतो, हे बघितले जाते.

Take a Poll

मिळाला होता निसटता विजय

2019 मध्ये शिवसेनेचे किशोर पाटील यांनी अपक्ष अमोल शिंदे यांचा 2 हजार 84 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. आता अमोल शिंदे पुन्हा तयारी करीत आहेत.

किशोर पाटील 2014 साली आणि 2019 साली ते शिवसेनेच्या तिकिटावर विजयी

किशोर पाटील हे किशोर आप्पा म्हणून संपूर्ण पाचोऱ्यात प्रसिद्ध आहेत. स्पष्टवक्ते आणि बेधडक व्यक्तिमत्व म्हणून किशोर पाटील यांना ओळखले जाते. त्यांचा जनसंपर्क खूप मोठा आहे. काम घेऊन आलेला माणूस कधीही रिकाम्या हाताने जात नाही अशी ख्याती किशोर पाटील यांनी निर्माण केलेली आहे. किशोर पाटील यांचे संपूर्ण कुटुंबच लोकांमध्ये मिसळणारे कुटुंब म्हणून ओळखले जाते. 2014 साली आणि 2019 साली ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. दोन्ही टर्ममध्ये त्यांनी धडाकेबाज विकासकामे आपल्या मतदारसंघात राबवलेली आहेत.

2019 नंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाली. उद्धव ठाकरे यांनी महायुती तोडून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्यात न भूतो न भविष्यती असा राजकीय संघर्ष पहावयास मिळाला. विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सत्ताधाऱ्यांची सपशेल पोलखोल केली. सत्ताधारी पक्षाचे नेते एका मागोमाग एक अडचणीत येत गेले.

किशोर पाटील यांनी 2022 साली एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. महाराष्ट्रभरातील 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ दिली. अपक्ष आमदार देखील शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले. शिवसेनेतून जा आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठबळ दिले त्यात पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांचाही समावेश आहे आता त्यांचा विजय होतो का हे पाहायचे आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+