सलग तिसऱ्या विजयासाठी किशोर पाटील सज्ज, सख्या चुलत बहिणीशी होणार आहे सामना

Maharashtra Assembly Election 2024 : उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला पाठबळ देणारा जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यातील गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील हे आमदार तर जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील अपक्ष उमेदवार म्हणून निवडून गेले. या सर्वांनाच शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिली असून किशोर पाटील पाचोरा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा लढत देत आहेत.

किशोर पाटील हे किशोर आप्पा म्हणून संपूर्ण पाचोऱ्यात प्रसिद्ध आहेत. स्पष्टवक्ते आणि बेधडक व्यक्तिमत्व म्हणून किशोर पाटील यांना ओळखले जाते. त्यांचा जनसंपर्क खूप मोठा आहे. काम घेऊन आलेला माणूस कधीही रिकाम्या हाताने जात नाही अशी ख्याती किशोर पाटील यांनी निर्माण केलेली आहे. किशोर पाटील यांचे संपूर्ण कुटुंबच लोकांमध्ये मिसळणारे कुटुंब म्हणून ओळखले जाते. 2014 साली आणि 2019 साली ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. दोन्ही टर्ममध्ये त्यांनी धडाकेबाज विकासकामे आपल्या मतदारसंघात राबवलेली आहेत.

Kishor Patil

एकनाथ शिंदे यांना साथ

2019 नंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाली. उद्धव ठाकरे यांनी महायुती तोडून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्यात न भूतो न भविष्यती असा राजकीय संघर्ष पहावयास मिळाला. विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सत्ताधाऱ्यांची सपशेल पोलखोल केली. सत्ताधारी पक्षाचे नेते एका मागोमाग एक अडचणीत येत गेले.

शिवसेनेच्या आमदारांची प्रचंड घुसमट होत होती. त्यात शिवसेनेत प्रचंड गटबाजीही निर्माण झाली. निवडून आलेल्या आमदारांना कोणी विचारत नव्हते आणि मागल्या दाराने आमदार झालेल्या लोकांची चलती होती. त्यामुळे शिवसेनेतील धुसफूस दिवसागणिक वाढत होती. आणि 2022 साली एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. महाराष्ट्रभरातील 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ दिली. अपक्ष आमदार देखील शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले. शिवसेनेतून जा आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठबळ दिले त्यात पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांचाही समावेश आहे.

मतदारसंघासाठी निधी खेचून आणला

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर किशोर पाटील यांनी त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून आपल्या मतदारसंघासाठी निधी खेचून आणला. बंडखोर आमदारांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांवर पलटवार करण्यातही किशोर पाटीलच आघाडीवर होते. पाचोरा विधानसभा मतदारसंघात किशोर पाटील यांनी राबवलेली कामे आणि अमलात आणलेल्या योजना कौतुकास्पद म्हणाव्यात अशा आहेत.

60 कोटींची भूमिगत गटार योजना

किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यातून पाचोरा शहरात भूमिगत गटार योजना आणि सांडपाणी पद्धती राबवण्यात आली आहे तब्बल 60 कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पाची अंमलबजावणी शहरात करण्यात आली. तसेच पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाचोरा शहरासाठी 22 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला शहरातील 35 ते 40 हजार नागरिकांना या प्रकल्पाचा लाभ होत आहे. तहसीलदार पाचोरा यांच्या माध्यमातून 60 कोटी रुपये खर्च करून घरांची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे 22 कोटी रुपये खर्च करण्यात आलेल्या कजगाव रेल्वे पुलाची उभारणी देखील किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यातून करण्यात आली. या पुलाचा फायदा 25 हजार नागरिक घेत आहेत.

गिरणा नदीवर पुलाची उभारणी

गिरणा नदी ही जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाची नदी आहे. या नदीवर 18 कोटी रुपये खर्च करून गुढे नवरे पुलाची बांधणी करण्यात आली. 15000 नागरिकांची या पुलामुळे सोय झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची योजना महाराष्ट्रात सर्वाधिक प्रभावीपणे पाचोरा विधानसभा मतदारसंघात राबवण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत 60 हजार 248 महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

ग्रामीण रुग्णालयासाठी 5 कोटी

आपल्या मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यातून पाचोरा शहरात ग्रामीण रुग्णालयासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. एक लाख नागरिकांना याचा लाभ होत आहे. याव्यतिरिक्त विकासाच्या अन्य योजना आणि लोककल्याणाचे अनेक कार्यक्रम किशोर पाटील यांनी पाचोरा विधानसभा मतदारसंघात राबवले. या माध्यमातून किशोर पाटील हे घराघरात पोहोचले आहेत.

येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा सामना त्यांच्या कुटुंबातील सदस्याशी म्हणजे बहिणीशी होत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष भावा बहिणीच्या या लढतीकडे लागले असून जबरदस्त विकासकामांच्या जोरावर किशोर पाटील हे सलग तिसऱ्या विजयासाठी सज्ज झाले आहेत. मतदारसंघात राबवलेल्या विकासकामांच्या जोरावर किशोर पाटील विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+