Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'ओ लक्ष्मण सर... जनाची नाही तर मनाची ठेवा'; पैशांची ऑफर स्वीकारताच तरुणाने काढली हाकेंची 'लाज'

OBC Leader Laxman Hake in Controversy : ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुन्हा एकदा एका नव्या वादामुळे चर्चेत आले आहेत. त्यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, यामध्ये एका तरुणाने त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पैशांची ऑफर दिली आणि ती स्वीकारताच त्यांची जाहीर कानउघाडणी केली. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात खळबळ उडाली आहे.

OBC Leader Laxman Hake

नेमके काय घडले?

एका व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये, एक तरुण लक्ष्मण हाकेंना त्यांच्या संघर्षामुळे समाजाला यश मिळत असल्याचे सांगतो आणि त्यांच्या गाडीसाठी पेट्रोलचे पैसे देण्याची ऑफर देतो.

तरुण फोन पे किंवा गुगल पे द्वारे पैसे पाठवण्याचा आग्रह धरतो. सुरुवातीला हाके भेटल्यावर पैसे घेण्याचे सांगतात, पण तरुणाच्या आग्रहामुळे ते आपल्या ड्रायव्हरचा युपीआय नंबर देतात, कारण त्यांचे स्वतःचे बँक खाते नाही, असे ते सांगतात.

ड्रायव्हरचा नंबर मिळताच, तरुणाचा सूर पूर्णपणे बदलतो. तो हाकेंना समाजासाठी काम करता, मग अशाप्रकारे लोकांकडून पैसे का घेता, असा जाब विचारतो.

तो हाकेंना "जनाची नाही तर मनाची लाज ठेवा" असे म्हणत, समाजाच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप करतो. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांवरूनही तो हाकेंवर टीका करतो आणि त्यांची राजकीय औकात काढतो.

ऑडिओ क्लिपमधील संवादाचे काही अंश

लक्ष्मण हाके आणि तरुणामधील संवाद काय?

लक्ष्मण हाके - बोला

तरुण : तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते, तर मग काय आम्ही विचार केला किंवा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावे तुम्ही एवढा आपल्यासाठी पळत आहे.

लक्ष्मण हाके - काय देताय मानधन...कुठले गाव

तरुण - अकलूज.. तुम्हाला कधी समोर कुठे भेट झाली तर मग काय एवढे समाजासाठी पळत आहे. गाडीसाठी तेल लागते. तर कॅश स्वरूपात द्यायचे का गुगल पे फोन पे?

लक्ष्मण हाके - धन्यवाद दादा. भेटल्यावर द्या.

तरुण - तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर, त्याला यूपीआय पण आपल्याला करता येईल.

लक्ष्मण हाके - नाही राहू द्या. अकलूज परिसरात आल्यावर भेटू.

तरुण : नाही. भेटण्यापेक्षा युपीआयवर एक लाखापर्यंत अमाउंट जाते डायरेक्ट. तुम्ही कधी यायचे काय. आम्ही पण बाहेर पुण्याला असतो.

लक्ष्मण हाके - पुण्यातच आहे मी राहायला. कुठे राहता?

तरुण - कोथरूड.

हाके : उद्या आहे पुण्यात सकाळी.

तरुण - ऑफिसला जाताना येतो. तुमचा युपीआय नंबर असेल तर द्या ना.

हाके - पाठवतो एक मिनिट. रितेश गुगल पे, फोन पे नंबर दे.

यानंतर हाके यांचा ड्रायव्हर युपीआय नंबर सांगतो.

तरुण: सांगता का मला?

हाके - रितेश बाहेरवाड यांनी फोन पे नंबर सांगितला.

तरुण - सरांचा फोन पे नंबर नाही का.

हाके - ऐका ना माझा अकाउंट नाही. रितेश माझा ड्रायव्हर आहे. अकाउंटला मी पैसे घेत नाही.

तरुण - तुम्ही समाजासाठी एवढे काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हालाच सहकार्य करतेत. तुम्ही असे मस्तपैकी लोकांकडून पैसे घेता. सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याच बोलता. लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला. जनाची नाही तर मनाची. समाजाच्या विरुद्ध भडकवताय. जरांगेंला बोलता. सुपाऱ्या घेता. जनाची नाही तर मनाची. शहाजी बापूच्या विरोधात उभारला 200 मते पडली नाहीत. तुझी औकात नाही साल्या. तू समाजाच्या विरोधात काम करतो.

या क्लिपमध्ये, तरुणाने थेट आरोप केले आहेत की हाके समाजासाठी काम करण्याच्या नावाखाली पैसे घेत आहेत आणि राजकीय सुपाऱ्या घेऊन इतरांवर टीका करत आहेत. यापूर्वीही हाके यांच्या काही कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या, त्यामुळे या नवीन क्लिपमुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा प्रश्नांची सरबत्ती होत आहे.

ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि आर्थिक व्यवहारांबद्दल नवीन चर्चा सुरू झाली आहे. या घटनेवर हाके यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+