स्वप्नातलं नव घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी। विनातारण कर्ज मिळणार, लवकरच योजना येणार,कुणाला होणार लाभ?

Non-mortgage loans Scheme : घर हे अनेकांचे पहिले स्वप्न असते आणि ते का पहिले असू नये..? कारण छप्पर असेल तरच स्थिरता येते. याच घरासाठी प्रत्येकजण जीवाचे रान करतो. स्वप्नपुर्तीसाठी दिवसरात्र मेहनत करतो. पण घरासाठी गृहकर्ज घेताना मात्र मोठी दमछाक होते. घरासाठी कर्ज न मिळाल्याने अनेकांची स्वप्न स्वप्नच राहील्याची उदाहरणे आहेत.

घर खरेदी एवढे महाग झाली की, त्यासाठी कधी ना कधी कुणाला न् कुणाला गृहकर्ज घ्यावे लागते पण कर्जासाठी जी प्रक्रीया पार पाडावी लागते त्यात प्रत्येकजण पात्र असतोच असे नाही. मग घर बघूनही कर्ज मिळत नसल्याने त्रास सहन करावा लागतो. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांना याचा फटका बऱ्याचदा बसतो. सॅलरी स्लीप नसली तर अजूनच त्रास पण अशातच गृहकर्ज घेणारांसाठी एक चांगली मोठी बातमी आली आहे.

Non-mortgage loans

नवीन गृहकर्ज योजना अमलात आणण्याचा सरकार विचार करत आहे. केंद्र सरकारच्या या योजनेची लोकांना प्रतिक्षा आहे. याचा अल्प आणि मध्यम वर्गातील गटांना मोठा लाभ मिळण्याची शक्यताही आताच व्यक्त होत आहे.

काय आहे गृहकर्ज योजना?

लोकमत डाॅट. काॅमच्या वृत्तानुसार, नवीन योजनेअंतर्गत केंद्र सरकार 20 लाखांपर्यंतच्या गृहकर्जाच्या काही रकमेची हमी घेणार आहे. यासाठी बँकेकडे काहीही तारण ठेवण्याची गरज नाही. अनेकदा कर्ज घेणाऱ्यांना बँका तारण मागतात. तारण ठेवण्याजोगी गोष्ट आपल्याकडे नसेल तर कर्ज मिळत नाही. त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरू शकतो.

हेही वाचा : RBI Monetary Policy : रेपो दरात कोणताही बदल नाही,गृहकर्ज, वाहन कर्जावर काय होणार परिणाम घ्या जाणून

नवीन गृहकर्ज योजनेत कर्जाच्या रकमेचा काही भागाची सरकार हमी घेणार आहे. यासाठी काहीही तारण ठेवण्याची गरज नाही. म्हणजेच कोणत्याही मालमत्तेची कागदपत्रे बँका किंवा गृहकर्ज देणाऱ्या एजन्सीकडे गहाण ठेवायची गरज नाही.

  • गृहकर्ज मंजुरी फक्त ऑनलाईन व्यवहाराद्वारेच मंजुर होईल.
  • शून्य तारण गृहकर्जासाठी कागदपत्रेही कमी लागणार आहेत.
  • थर्ड पार्टीच्या बँक गॅरंटीचीही गरज खूपच कमी असेल

    हेही वाचा : प्रधानमंत्री आवास योजना 2 सुरु! नवीन हक्काच्या घरांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज, 'ही' आहे पात्रता, वाचा

    30 वर्षांसाठी मिळणार नवीन गृहकर्ज

    • नागरिकांना गृहकर्ज सोईचे करण्यासाठी केंद्र सरकार उद्योजकांना जलद कर्ज देण्यासाठी वापरले जाणाऱ्या क्रेडिट गॅरंटी फंडासारखे उपाय करणार आहे.
    • नवीन गृहकर्ज योजनेचे नावाचा विचार केल्यास कमी उत्पन्न असलेल्या घरांसाठी क्रेडिट रिस्क गॅरंटी फंड असे असू शकते.
    • आगामी अर्थसंकल्पात ही योजना आणण्याचा सरकार विचार करु शकते.
    • विशेषतः 30 वर्षांसाठी हे गृहकर्ज दिले जाऊ शकते.
    • प्रधानमंत्री आवास योजनेपेक्षा सोप्या अटींवर हे कर्ज दिले जाऊ शकते जे सर्वांसाठी घर या केंद्र सरकारच्या उद्दीष्टांसाठी पुरक असेल.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+