Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गडकरींची वाहनधारकांसाठी मोठी घोषणा, 10 दिवसांत टोल शुल्क कमी होणार, म्हणाले - मलाही फाईन बसला!

Nitin Gadkari's big announcement : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनधारकांसाठी एक गुड न्यूज दिली आहे. विशेषतः दहा दिवसांत टोल शुल्क कमी होणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. यासह नागरिकांनी वाहतूक नियम पाळावेत असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

सीएनन न्यूज - 18 रायझिंग भारत समित 2025 च्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते, त्यांनी टोल, रस्ते बांधनी, अपघात यासंदर्भात वक्तव्य केले आहे.

Nitin Gadkari s big announcement

वांद्रे वरळी सी - लिकंवर बसला दोनवेळा भुर्दंड

खास गोष्ट म्हणजे मुंबईत जे रस्ते आपल्या मार्गदर्शनाखाली बनले त्याच रस्त्यावर आपले दोनवेळा चालान कापले गेले. त्यात वांद्रे - वरळी सी लिंकचा समावेश आहे.

10 दिवसांत टोल कमी होणार

नितीन गडकरी रस्ते टोलमुक्त करण्याचे धोरणाबद्दल व्यक्त झाले. ते म्हणाले की, सरकार सामान्यांना दिलासा देणाऱ्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी स्पष्ट केले की, येत्या आठ ते दहा दिवसांत टोल कमी केला जाईल, टोलचटी रक्कम शंभर टक्के कमी केली जाणार आहे.

रस्ते बांधणी, पन्नास टक्के अपघात

रस्ते अपघात कमी करण्यासंदर्भातील उद्दीष्टांबद्दल नितीन गडकरी यांनी मत व्यक्त केले की, पन्नास टक्के अपघात कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे ते आमचे उद्दीष्ट होते, मात्र हे उद्दीष्ट साध्य करु शकलो नाही. अपघाताचे कारण रस्ते बांधणी हे आहे रस्ते बांधणीत काही त्रुटी होत्या. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी चाळीस हजार कोटींचा खर्च केला आहे हेही त्यांनी सांगितलं.

..म्हणुन होतात रस्ते अपघात

आतापर्यंत झालेल्या 30 हजार रस्ते अपघातांला एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे, हेल्मेट न घालता गाडी चालवणे हे होय. नितीन गडकरी म्हणाले, मी नागपूरमध्ये एक तलाव बांधला होता, एकदा मी 40-50 लोकांसह जात होतो, तेव्हा मला दिसलं की एक व्यक्ती त्या तलावामध्ये लघूशंका करत होती, ते पाहून मला खूप राग आला. उल्लंघन हे संस्कारांशी संबंधित आहे ज्यांचा संबंध प्रशिक्षणाशी येतो. काळ बदलत चालला तसा माणूसही बदलत आहे हेही गडकरी यांनी स्पष् केले.

हेही वाचा : एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; नितीन गडकरी म्हणाले- राजकारण असंतुष्ट आत्म्यांचा महासागर, CM ते...

हेही वाचा : आजपासून 'फास्टॅग'सक्ती, अन्यथा दुप्पट टोल भरा, 'समृद्धी'चा प्रवास महागला! वाचा किती बसणार खिशाला झळ

रस्ते अपघाताचे प्रमुख कारण काय आहेत?

रस्ते अपघाताचे प्रमुख कारण म्हणजे हेल्मेट परिधान न करणे आणि खराब रस्ते, त्यावरील खड्डे हे आहे.

नितीन गडकरी हे कधी मुख्यमंत्री झाले आहेत का?

नाही, नितीन गडकरी कधीही मुख्यमंत्री झालेले नाहीत.

नितीन गडकरींचे चालान कापले गेले का?

होय...नितीन गडकरी यांचे वांद्रे वरळी सी- लिंकवर दोनवेळा चालान कापले गेले, ही बाब त्यांनीच स्पष्ट केलेली आहे.

नितीन गडकरी कोणत्या खात्याचे मंत्री आहेत?

नितीन गडकरी रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+