आजपासून ‘फास्टॅग'सक्ती, अन्यथा दुप्पट टोल भरा, ‘समृद्धी'चा प्रवास महागला! वाचा किती बसणार खिशाला झळ
Mumbai News FASTag mandatory from today : राज्यात आजपासून फास्टॅग प्रणाली सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे आता जर फास्ट टॅग प्रणालीचा वापर न केल्यास दुप्पट टोल भरावा लागणार आहे. महत्वाची बाब म्हणजे आजपासून नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचा प्रवासही खर्चिक झाला असून
पथकरात वाढ, ...तर दुप्पट भरावा लागणार
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एमएसआरडीसीने पथकरात 19 टक्क्यांनी वाढ केली आहे, त्यामुळे आता आता छोट्या चारचाकी वाहनांना नागपूर-इगतपुरी प्रवासासाठी 10180 ऐवजी 1290 रुपये मोजावे लागतील. दुसरीकडे राज्यातील सर्वच महामार्गांवर टोलवसुलीसाठी आजपासून 'फास्टॅग' प्रणाली सक्तीची झाली असून सर्व 'हायब्रीड' मार्गिका मध्यरात्रीपासून बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी 'फास्टॅग स्टिकर' किंवा त्या खात्यात रक्कम नसल्यास दुप्पट पथकर द्यावा लागेल.

समृद्धीवर कोणत्या वाहनांना किती लागणार नवीन कर
नागपूर मुंबई हा समृद्धी महामार्ग जवळपास 701 किलोमीटर लांबीचा आहे. त्याला तयार करण्यासाठी सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्च आला आहे.
वेळ वाचेल पण पैसा खर्च होणार
समद्धीचा नागपूर ते इगतपुरी हा 625 किमीचा टप्पा सेवेत दाखल झाला असून अखेरचा इगतपुरी-आमणे हा ७६ किमीचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असला तरी प्रवाशांना आर्थिक झळ बसणार आहे.
एकेरी प्रवासासाठी आधीचा टोल आणि आताचा टोल किती
- मुंबई-नागपूर एकेरी प्रवासासाठी हलक्या चारचाकी वाहनांना 1445 रुपये मोजावे लागणार आहे.
- हलक्या चारचाकी वाहनांना आधी 1080 लागायचे आता 1290 लागणार आहे.
- हलकी व्यावसायिक वाहने 1745 लागत होते आता 2027 लागेल.
- बस, दोन आसांचे ट्रक 3655 लागत होते आता 4355 रुपये लागेल.
- तीन आसांची व्यावसायिक वाहने 3990 लागत होते आता 4750 लागणार आहेत.
- बांधकाम यंत्रसामग्री 5740 लागत होते आता 6830 लागेल.
- अतिअवजड वाहने 6980 लागत होते 8315 आता लागणार आहे.












Click it and Unblock the Notifications