Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नितीन गडकरींचा गौप्यस्फोट! म्हणाले- "मला विरोधीपक्षातील ज्येष्ठ नेत्याकडून पंतप्रधानपदाची ऑफर होती"

Nitin Gadkari was offered the post of PM by the opposition : लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान पदाची मला ऑफर आली होती.पण मी ज्यांनी ऑफर दिली त्यांचे नाव घेणार नाही असा गोप्यस्फोट खुद्द भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केला आहे. नागपूर इथं एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. नितीन गडकरींच्या या विधानावरुन आता चर्चांना उधाण आला आहे.

देशात लोकसभेला भाजपला पुर्णतः बहुमत मिळाले नसल्याने त्यांना नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठबळावर सरकार स्थापन करावं लागलं. त्याआधी पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण हे सांगण्याची गरजच नव्हती कारण नरेंद्र मोदींसारखा धुरंधर नेत्याची या पदासाठी आधीच निश्चिती झाली होती. पण तरीही नितीन गडकरी यांना पंतप्रधान पदासाठी अनेकदा नावं घेतले गेलं होतं ते भाजपकडून पण या लोकसभा निवडणुकीवेळी मात्र, विरोधकांकडून त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली होती. त्यामुळं राजकीय वर्तुळात आता गडकरींना मिळालेल्या ऑफरची चर्चा रंगली आहे.

Nitin Gadkari was offered the post of PM by the opposition

नेमकं काय म्हणाले गडकरी?

नितिन गडकरी यांनी जे वक्तव्य केलं त्यानुसार.. "काही दिवसांपूर्वी एक घटना घडली. या घटनेतील नेत्याचे नाव मी तुम्हाला सांगणार नाही. पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. त्यावर मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पंतप्रधान पदासाठी का पाठिंबा देणार आणि तो पाठिंबा मी का घ्यावा?"

"मी त्या नेत्याला स्पष्टपणे सांगितलं की, पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे" असा किस्सा नितीन गडकरी यांनी सांगितला.

गडकरींच्या गोप्यस्फोटानं राजकीय वर्तुळात चर्चा

नितीन गडकरींनी सांगितलेल्या या किस्स्यानंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे भाजपमध्ये असताना नितीन गडकरींच्या पंतप्रधानपदासंदर्भात ज्या चर्चा व्हायच्या त्या आता पुन्हा नव्याने सुरु झाल्या आहेत.

2014 पासून नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त भाजपमध्ये इतर कोणीही पंतप्रधानपदासाठी दावा केलेला नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार याची चर्चा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्यानंतर योगी आदित्यनाथ, अमित शाह यांची नावे पंतप्रधानपदासाठी चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावर आता नितीन गडकरी यांच्या नावाची भर पडली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+