अनिल देशमुखांच्या गौप्यस्फोटाची गंभीर दखल, तपासे म्हणाले- भाजपचा ठाकरे, पवारांचा पक्ष संपवण्याचा कट

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गौप्य स्फोटाची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने घेतल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी माध्यमांना दिली.

राजकारण आणि सत्तेसाठी भारतीय जनता पार्टी किती खालची पातळी गाठू शकते याचे हे उदाहरण आहे असे तपासे म्हणाले.

BJPs plan to end Uddhav Thackeray Sharad Pawars party maharashtra news

ठाकरे, पवारांचा पक्ष संपवण्याचा घाट

शिवसेना फोडण्याचं श्रेय याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतले आहे व त्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवारांना स्वतःच्या सरकारमध्ये सामील करत भाजपने महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी ही नामशेष करण्याचा डाव आखला, परंतु मायबाप जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टी यांना त्यांची जागा दाखवली असा टोला महेश तपासे यांनी लगावला.

अनिल देशमुखांना टार्गेट केले

महेश तपासे म्हणाले, माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या खोट्या आरोपाचा आधार घेत भारतीय जनता पार्टीने अनिल देशमुख यांना टार्गेट केले होते. तत्कालीन ठाकरे सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती.

न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाने त्यांचा अहवाल यापूर्वीच सरकारला सादर केला तरीही सरकार सदरचा अहवाल विधानसभेच्या पटलावर आणत नाही ही गंभीर बाब आहे व यातून शुद्ध राजकीय हेतू समोर येतो असा आरोप महेश तपासे यांनी केला. न्यायमूर्ती चांदीवर आयोगाचा अहवाल सरकार का जाहीर करीत नाही याचे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी द्यावे अशी मागणी महेश तपासे यांनी उपस्थित केली.

समित कदम कोण आहे?

समित कदम कोण आहे ? त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचा संबंध काय ? कुठल्या कारणास्तव समित कदम याला वाय दर्जाची सुरक्षा देवेंद्र फडणवीस यांनी दिली याचा खुलासा राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी मागणी महेश तपासे यांनी केली. समित कदम या इसमाची नारको चाचणी करण्याची मागणी महेश तपासे यांनी यावेळी केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+