Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शरद पवारांच्या पक्षाचा गटनेता ठरला; सर्वात तरुण आमदार रोहित पाटलांवर मोठी जबाबदारी!

NCP Sharad Pawar Party Legislature Group Leader Jitendra Awhad : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईत बैठक संपन्न झाली.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षाचा विधिमंडळ गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे.

रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी?

तर या बैठकीत अतिशय महत्त्वाचा दुसरा निर्णय झाला आहे. यात दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार असलेल्या रोहित पाटील यांना मुख्य प्रतोदपदी संधी देण्यात आली आहे.

त्यामुळे, कमी वयात मोठी जबाबदारी रोहित पाटील यांच्यावर शरद पवारांनी टाकल्याचं पाहायला दिसून आले आहे. तसेच, आमदार उत्तम जानकर यांना देखील प्रतोदपदी कार्यभार देण्यात आला आहे.

Maharashtra Assembly Election 2024

जयंत पाटील म्हणाले की, विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांबाबत आज निर्णय झाला नाही, आज 9 सदस्य उपस्थित होते, आजच्या बैठकीला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित नव्हते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा जिंकल्या आहेत. त्यात, तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील तर माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर विधानसभेत पोहोचले आहेत.

सत्तास्थापनेवरुन जयंत पाटलांचा टोला

मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी महत्त्वाची घोषणा केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, जर आमचे सरकार आले असते तर आम्हाला 26 नोव्हेंबरलाच शपथविधी घ्यावा लागला असता. कारण, राज्यपाल महोदयांनी आमच्यावर एक प्रकारे निमंत्रण देऊन दबाव देखील आणला असता, परंतु, राज्यपाल त्यांचे केंद्रात सरकार देखील त्यांचे असल्याने भाजपाच्या सोईनुसार हे सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+