Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू, अभिनेता संजय दत्तची हॉस्पिटलमध्ये धाव

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्यांना मुंबईच्या वांद्रेमध्ये असलेल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे.

बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोरच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला आहे. ज्या भागात झिशान सिद्दीकी हे आमदार आहेत तिथेच ही घटना घडली आहे. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Baba Siddique and sanjay dutt

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी समजताच अभिनेते संजय दत्त यांनी लीलावती हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेतली. बाबा सिद्दीकी आणि संजय दत्त यांची मैत्री जगजाहीर आहे. त्यामुळेच आपल्या मित्राच्या मदतीसाठी अभिनेते संजय दत्त तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखला झाला आहे.

मुंबईचे राजकारणी अशी बाबा सिद्धीकी यांची ओळख आहे. पण बाबा सिद्दीकी आणि बॉलिवूड यांचंही घट्ट नातं होतं. बड्याबड्या सेलिब्रिटींशी त्यांचे जवळचे संबंध होते. मुंबईत वांद्रेमध्ये राहणाऱ्या बाबा सिद्दीकी यांच्या घरी इफ्तार पार्टीला अनेक सेलिब्रिटी येत असत.

अभिनेते सुनील दत्त हे बाबा सिद्दीकी यांचे मेंटॉर

काँग्रेस नेते सुनील दत्त हे ईदच्या दिवसांमध्ये ईफ्तार पार्टी आयोजित करत असत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नंतर बाबा सिद्दीकीही अशी ईफ्तार पार्टी आयोजित करू लागले.

बाबा सिद्दीकी काँग्रेसचे नेते सुनील दत्त यांच्या जवळचे होते. त्यांच्यामुळेच त्यांची संजय दत्त यांच्याशी ओळख झाली. संजूबाबा आणि बाबा सिद्दीकी यांची नंतर घट्ट मैत्री जमली. संजय दत्त मुळेच त्यांची सलमान खानशीही गट्टी झाली.

बाबा सिद्दीकी अशा प्रकारे बॉलिवूडचेच मित्र बनले. अशाच एका इफ्तार पार्टीमध्ये फक्त सलमान खानच नाही तर शाहरुख खानही आला होता. या दोन्ही स्टार्सनी या पार्टीत एकमेकांना अलिंगन दिलं त्याची खूप चर्चाही झाली. शाहरुख खान, सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांचे हे फोटो खूप व्हायरलही झाले होते. या इफ्तार पार्टीच्या आधी शाहरुख आणि सलमान खान यांच्यामध्ये एक कोल्ड वॉर सुरू होतं. पण या पार्टीत मात्र त्यांची दिलजमाई झाली, असं म्हटलं जातं.

यानंतर बाबा सिद्दीकी आणि बॉलिवूड यांचं नातं आणखीनच घट्ट झालं. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये यावर्षी कोण स्टार येणार याच्याही चर्चा रंगू लागल्या... ईद मिलन या नावाने ही इफ्तार पार्टी प्रसिद्ध होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+