Saputara Ghat Accident : सापुतारा घाटात 200 फूट खोल दरीत ट्रव्हल्स कोसळली, बसचे तुकडे, 7 जण ठार
रविवारी सकाळीच एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यात सात लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे डझनभर लोकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. नाशिक जिल्ह्यात हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक - गुजरात महामार्गावरील सापुतारा घाटात खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सुमारे सात लोकांचा जागीच जीव गेला. तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बस 200 फूट दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 7 जण जागीच ठार तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी पहाटे 5:30 वाजेच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली आहे.
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की, बस घाटात कोसळल्याने दोन तुकडे झाले आहेत. नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना ही घटना घडली आहे. अपघातातील मृत व जखमी हे सर्व मध्यप्रदेशातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
बसचे अक्षरशः दोन तुकडे
अपघात इतका भीषण होता की, यात बसचे अक्षरशः दोन तुकडे झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बसचा अपघात नेमका कसा झाला? याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही.
बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानंतर हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळावरुन सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातग्रस्त बसचा सांगाडा देखील घटनास्थळावरुन हटवण्याचे काम सुरू आहे.
अपघातातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे
- रतनलाल जाटव, बस चालक
- भोलाराम कुशवाह, रा. रामगड, शिवपुरी
- गुड्डी राजेश यादव, रा. रामगड, शिवपुरी
- कमलेश वीरपाल यादव, रा. रामगड, शिवपुरी
- ब्रिजेंद्र उर्फ पप्पू यादव, रा. बिजरौनी, शिवपुरी.












Click it and Unblock the Notifications