भुजबळांना शुभेच्छा अन् राहुल गांधींना टोला... नारायण राणेंनी टाकले शाब्दीक बाँम्ब
काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. याच आरोपांचा भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे चांगलाच समाचार घेतला. पत्रकारांनी भुजबळ, नितेश व निलेश राणे या विषयावरही नारायण राणे यांना प्रश्न विचारले. त्यावरही नारायण राणेंनी दिलखुलास प्रतिक्रिया दिल्या.

राहुल गांधींवर टिका
राहुल गांधी यांच्य परभणी येथील आरोपांकडे पत्रकारांनी नारायण राणे यांचे लक्ष वेधले. त्यावेळी नारायण राणे म्हणाले, राहुल गांधींना महाराष्ट्रात कधी कळालाय का..? राहुल गांधींना कधी डाँ. बाबासाहेब आंबेडकर तरी काळालेत का..? निळे कपडे घातले म्हणून कुणी आंबेडकरवादी होत नाही. ते निळे कपडे घालून परभणीत आले, पण नुसते कपडे घालून उपयोग नसतो आतमध्ये काहीतरी असावं लागतं... असा टोला नारायण राणेंनी लगावला.
भुजबळांचे केले स्वागत
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या नाराज आहेत. त्यांनी आज सागर बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीबाबत नारायण राणे यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर ते म्हणाले, भुजबळ साहेब आम्हाला सिनीअर आहेत. ते ज्येष्ठ असल्याने आम्ही काही दिवस त्यांच्या गटात होतो. कदाचित दिल्लीतील हवा चांगली आहे म्हणून भुजबळांना दिल्लीत बोलवत असावेत. पण भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा...
मुलांचा अभिमान
निलेश व नितेश हे दोन्ही मुले आमदार झाल्याबद्दल नारायण राणे यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर नारायण राणे म्हणाले, दोन्ही मुले आमदार, त्यातला एक मंत्री आणि बाप खासदार... देशात तरी असे उदाहरण आहे का? नितेश राणे मंत्री झाल्यामुळे मला अभिमान वाटतो. मी फार खूश व समाधानी आहे, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications