Napgur Crime News: स्वारगेट बसस्थानकातील घटनेनंतर नागपूरमध्ये बसस्टॉपवर महिलेसोबत धक्कादायक प्रकार!
Napgur Crime News : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या गंभीर अत्याचार प्रकरणानंतर आता नागपूरमधून धक्कादायक प्रकार घडला आहे. बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेसोबत गैरवर्तन करत असल्याचा प्रकार घडला. गैरवर्तन करणारा नेहमीच बसस्थानक परिसरात येत असल्याची बाबही समोर आली आहे.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच घडला. हे प्रकरण चर्चेत आले आणि संशयित आरोपीला अटकही झाली. त्यानंतर बसस्थानकातील सुरक्षाव्यवस्थेचा धांडोळा परिवहन मंत्र्यांनी घेत काही आदेशही दिले आहेत. पण त्यानंतरही नागपूर बसस्टाॅपवर महिलेसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार घडला.

काय होता प्रकार?
न्यूज 18 मराठीच्या वृत्तानुसार, बसमध्ये चढण्याचे नाटक करत संशयिताने महिलेशी गैरवर्तन केले. दरम्यान तो महिलेशी लगट करत असल्याचे समोर आले. संशयिताचे नाव मंगेश असून तो विकृत मानसिकतेचा असल्याचे समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार, संशयिताला बस स्टॅापवरील सुरक्षा रक्षकाने पकडून गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी या संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.
कोण आहे संशयित?
संशयिताचे नाव मंगेश असून तो विकृत मानसिकतेचा असल्याचे सांगण्यात आले आहे. तो नेहमी मध्यवर्ती बसस्थानकावर नेहमी वावरतो, असे पोलिस तपासात समोर आले आहे. तो महिलांशी लगट करण्याचा प्रयत्न करतो अशी बाबही तपासात समोर आली आहे.
गर्दीत साधायचा संधी
संशयित मंगेश नामक व्यक्ती महिलांशी असभ्य वर्तन करायचा आणि त्यांच्याकडे घाणेरड्या दृष्टीने बघत होता. महिलांशी लगट करण्याचा त्याचा प्रयत्न असायचा, याबाबत चौकशीतून पोलिसांना माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान बसमध्ये चढण्याचे नाटक करत तो महिलेशी गैरवर्तन करत होता. हा प्रकार एका सुरक्षारक्षकाला समजला. त्याने संशयित महिलांशी गैरवर्तन करीत असतानाचा व्हिडीओ काढला. यानंतर पोलिसांकडे हे प्रकरण गेले. संशयित प्रवासी नसून केवळ याच गोष्टीसाठी बसस्टाॅपवर येत असल्याची बाब समोर आली आहे.
महिलांशी लगट करण्याचा प्रयत्न
संशयित मंगेश नेहमी बस स्टॉपवर उभा असायचा. मोकळ्या बस तो सोडून द्यायचा. जेव्हा गर्दी दिसेल, तेव्हा तो संधी साधायचा. गर्दीमधून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करायचा, त्यावेळी बसमध्ये चढणाऱ्या महिलांशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा. अनेकदा आरोपी मंगेश अससा प्रकार करत असल्याचं लक्षात येताच सुरक्षा रक्षकाने आरोपीला पकडलं अन् पोलिसांच्या हवाली केलं.












Click it and Unblock the Notifications