मुलाची आत्महत्या, वडील धक्क्याने गेले; त्या पाठोपाठ आईलाही हृदयविकाराचा झटका; मन हेलावणारी घटना!
कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने मात्र, संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. तरणाबांड करता मुलगा गेल्याने वडीलांनीही देखील त्याच्या पाठोपाठ डोळे मिटून घेतले.
तर पती व मुलाच्या निधनानंतर घरातील तरुणाची आईलाही हृदयविकाराचा धक्का बसला, या धक्कादायक घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, सदर तरुणाची आई सद्या रुग्णालयात शेवटच्या घटना मोजत असल्याचे सांगितले जात आहे.

अवघ्या 27 वर्षाच्या युवा शेतकऱ्याने कर्ज आणि नापिकीला, आर्थिक संकटाला कंटाळून मृत्युला कवटाळले. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथे ही घटना घडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी पीडित कुटुंबीयांना आधार देत पुढाकार घेतला आहे. परंतु प्रशासनाकडे देखील या कुटुंबाला मदत करण्याची मागणी केली जात आहे.
शेतातील झाडाला गळफास घेऊन युवकाने संपवले आयुष्य
वडील भीमराव बेदरे यांना साडेतीन एकर कोरडवाहू शेती, या शेतीवर भारतीय स्टेट बँकेचे कर्ज. त्यातच, बेदरे यांना आजाराने ग्रासल्याने ते अंथरुणाला खिळले होते. कुटुंबाची जबाबदारी घरातील कर्त्या मुलावर म्हणजेच राहुलवर आली. शेती आणि मिळेल ती मजुरी करुन राहुल आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करत होता. पण, शेतीतील नापिकी आणि वडिलांचे आजारपणामुळे नैराश्याने त्यालाही ग्रासले. याच नैराश्यातून त्याने 10 जून रोजी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
तरुण मुलाच्या निधनाने वडीलांनाही बसला धक्का!
आपल्या तरुण मुलाच्या मृत्युच्या धक्याने वडिलांचाही दोन दिवसांत म्हणजेच 12 जून रोजी मृत्यू झाला. कुटुंबावर कोसलळेलं हे संकट आईच्याही काळजाचा ठोका चुकवणारं होतं.
मुलगा आणि पतीच्या मृत्युच्या घटनेनंतर आई शोभाबाई यांना हृदयविकाराचा झटका आला. सुदैवाने सध्या त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे, पण घरात दु:खाचा डोंगर असताना त्याही रुग्णालयात मृ्त्युशी झुंज देत आहेत.












Click it and Unblock the Notifications