Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नांदेड, नागपूर भीषण दुर्घटनांनी हादरले! नांदेड अपघातात 3 ठार, 35 जखमी, नागपूरमध्ये स्फोट 'एवढे' ठार

Nanded News Two accidents in District 3 dead : नांदेड आणि नागपूर जिल्हे मोठ्या दुर्घटनेने आज हादरले. नांदेडमध्ये दोन अपघात झाले असून यात ३ जण ठार झाले आहेत, तर 35 जण जखमी झाले आहेत. यात एक कार ट्रकचा अपघात तर दुसरा बस उलटून अपघात झाला. तर नागपूरंमध्येही सोलार एक्स्प्लोजिव्ह या शस्त्र निर्मिती कंपनीत स्फोट झाला, यात एक जण ठार झाल्याचे अधिकृत वृत्त आहे.

Nanded News Two accidents in District 3 dead

नागपूरमध्ये मध्यरात्री स्फोट झाला, या दुर्घटनेनंतर घटनास्थळी पोलिस दल आणि अग्निशामक दलाने बचावकार्य सुरु केले आहे. दरम्यान घटनेनंतर जखमींना नागपूरमध्ये रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही प्रतिक्रिया आली आहे.

नागपूरमध्ये स्फोटात एक ठार

नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर स्थित बाजारगाव कोंढाळी येथील सोलार एक्सप्लोजिव या शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनीत आज मध्यरात्री स्फोट होऊन रात्रपाळीत काम करणाऱ्या कामगारांपैकी सुमारे 15 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे . जखमींना नागपूरकडे हलवण्यात आल आहे .भारतीय आयुध निर्माणी ची एक अन्सिलरी असलेल्या या कंपनीमध्ये 2023 मध्ये सुद्धा स्फोट होऊन कामगार मृत्युमुखी झाले होते .पंतप्रधानांनी याच वर्षी या कंपनीच्या लॉईटरिंग अम्युनिशेन फॅसिलिटीच देखील उद्घाटन केलं होतं.

माजी मंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यानी या घटनेनतर आपली प्रतिक्रीया पीटीआयला दिली. ते म्हणाले, "काही दिवसांपूर्वी नागपूरजवळील सोलर एक्सप्लोझिव्हज नावाच्या कारखान्यात स्फोट झाला. त्यात सतरा जण जखमी झाले आहेत आणि एकाचा मृत्यू झाला आहे. अशा स्फोटांमुळे सावधगिरी बाळगण्याची आणि सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज अधोरेखित होते. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. सरकारने सुरक्षा नियमांचे योग्य पालन केले जाईल याची खात्री करावी."

नांदेड जिल्ह्यात कार उभ्या ट्रकवर आदळली, 3 ठार

नांदेड जिल्ह्यात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाले तर 35 जण जखमी झाले आहेत. त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. भोकर तालुक्यातील पाळज येथील प्रसिद्ध गणपतीचे दर्शन घेऊन परत जाणाऱ्या एका कारने भोकर तालुक्यातील नांदा म्है.प. येथे उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यात तीन जण जागीच झाले. हे सर्व भाविक तेलंगणा राज्यातील होते.

बस उलटली, 32 प्रवासी जखमी

दुसऱ्या एका अपघातात देगलूर तालुक्यातील वजूर येथून देगलूरला निघालेली राज्य परिवहन महामंडळाची बस नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटली. यात बसमधील 32 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील गंभीर जखमी असलेल्या चार प्रवाशांना नांदेडमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांवर देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+