किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; शरद पवारांचे होते विश्वासू
Nanded News Former Kinwat Assembly MLA Pradeep Naik passed away : नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज 1 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. हैदराबाद येथे असताना त्यांचा मृत्यू झाला 2 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या मूळ गावी किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

शरद पवारांचे होते विश्वासू
दिवंगत प्रदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार यांचे ते विश्वासू म्हणून ओळखले जात होते. 1999 मध्ये त्यांनी किनवट विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली. मात्र त्यांना त्यात पराभव पत्करावा लागला होता. पुढे 2004, 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत सलग तीन वेळा त्यांनी किनवट मतदार संघात विजय मिळवला होता. किनवट मतदार संघात विकासाभिमुख राजकारण करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती.
हेही वाचा : शिवसेना नेते व माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन, नगराध्यक्ष ते खासदार असा होता प्रवास
हसतमुख व्यक्तिमत्व हरपलं
प्रदीप नाईक हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे नेते होते. पहिल्या निवडणुकीत जरी त्यांचा पराभव झाला होता तरीही त्यानंतर सलग तीनवेळा ते आमदार म्हणून किनवट मतदारसंघातून निवडून आले होते.
हेही वाचा : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन, PM मोदींकडून शोक व्यक्त, जाणून घ्या कुणाची काय प्रतिक्रीया?
सलग दोन निवडणुकीत पराभव
प्रदीप नाईक हे 2014 ला किनवट मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यानंतरही ते राजकारणात सक्रीय होते. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतरही त्यांची शरद पवारांना खंबीर साथ होती.
किनवट माहूर मतदारसंघाच्या विकासात योगदान
माजी आमदार प्रदीप नाईक यांचे किनवट-माहूर मतदारसंघात चांगलाच वरचष्मा होता. त्यांच्या कार्यकाळात या मतदारसंघात विकासाला चालना मिळाली होती. माजी आमदार नाईक यांचा अंत्यविधी दोन जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या मुळ गावी दहेली तांडा, ता. किनवट येथे होणार आहेत, त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
हेही वाचा : Zakir Hussain : तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन, वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास












Click it and Unblock the Notifications