Namo Shetkari Yojana नमो शेतकरी योजनेचे पैसे बँक खात्यात आले की नाही कसे तपासायचे? ही सोपी पद्धत
Namo Shetkari Yojana Status : नमो शेतकरी योजने'चा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज वितरित करण्यात आला आहे. याद्वारे राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्ऱ्या बँक खात्यात १८९२.६१ कोटी रुपये जमा होत आहेत.
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाला हातभार लावण्यासाठी 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' सुरू केली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेला पूरक म्हणून सुरू केलेल्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळत आहे. आजपासून नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्या खात्यात पैसे आले की नाही आणि जर खात्यात पैसे नाही आले तर कोणती प्रक्रीया करायची हे आपण जाणून घेऊया.

'नमो शेतकरी योजना' काय आहे?
उद्देश: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे.
रकमेत वाढ: यापूर्वी पीएम किसान योजनेचे ६,००० रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे ६,००० रुपये असे एकूण १२,००० रुपये मिळत होते. आता नमो शेतकरी योजनेत ३,००० रुपयांची वाढ झाल्यामुळे, शेतकऱ्यांना वर्षाला एकूण १५,००० रुपये मिळतील (पीएम किसानचे ६,००० + नमो शेतकरीचे ९,०००). या योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षात तीन समान हप्त्यांमध्ये रक्कम दिली जाते.
91 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेच्या 7व्या हप्त्याचे वितरण.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 9, 2025
लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष ₹6000 मिळणार. @Dev_Fadnavis#Maharashtra #DevendraFadnavis #NamoShetkari pic.twitter.com/WKo8ie92H2
'नमो शेतकरी योजनेचे' पैसे खात्यात आले हे कसे तपासावे?
तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, हे तपासण्यासाठी खालील सोप्या पायऱ्या फॉलो करा:
सर्वप्रथम नमो शेतकरी महासन्मान योजना (NSMNY) च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
https://nsmny.mahait.org/ हे शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. ('नमो शेतकरी महासन्मान योजना' असे सर्च करून अधिकृत वेबसाईट तुम्ही शोधू शकता.)
'बेनिफिशियरी स्टेटस' विंडो निवडा : संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला 'बेनिफिशियरी स्टेटस' (Beneficiary Status) नावाची विंडो दिसेल.
लॉगिन पर्याय निवडा: लॉगिन करण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध असतील:
- नोंदणी क्रमांक
- आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक
- आधार क्रमांक
- योग्य पर्याय निवडून पुढील रकान्यात माहिती भरा.
- कॅप्चा कोड भरा: दिलेल्या रकान्यात कॅप्चा कोड भरा.
OTP द्वारे पडताळणी: 'गेट आधार ओटीपी' (Get Aadhaar OTP) या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल. तो ओटीपी टाकून खाते व्हेरिफाय (Verify) करा.
माहिती तपासा: पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला तुमचा 'बेनिफिशियरी स्टेटस' दिसेल. यात तुमचे नाव, नोंदणी क्रमांक, मोबाईल नंबर आणि आत्तापर्यंत मिळालेल्या रकमेचा तपशील असेल.
- जर तुम्हाला 'एलिजिबिलिटी डिटेल्स' (Eligibility Details) हा पर्याय दिसला, तर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात.
- जर 'इन-एलिजिबिलिटी' (Ineligibility) असा पर्याय दिसला, तर तुम्ही अपात्र ठरला आहात आणि त्यामागे कारणही दाखवले जाईल.
FTO जनरेट झाला आहे हे कसे तपासाल?
- तुमच्या हप्त्यासाठी 'फंड ट्रान्सफर ऑर्डर' (FTO) जनरेट झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी:
- PFMS पोर्टलला भेट द्या: प्रथम 'पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टिम' (Public Finance Management System - PFMS) च्या पोर्टलला भेट द्या.
- 'डीबीटी स्टेटस ट्रॅकर' निवडा: पेमेंट स्टेटस (Payment Status) या विभागातील 'डीबीटी स्टेटस ट्रॅकर' (DBT Status Tracker) हा पर्याय निवडा.
- 'कॅटेगरी' निवडा: 'कॅटेगरी' (Category) विभागात जाऊन 'डीबीटी एनएसएमएनवायएस पोर्टल' (DBT NSMNYS Portal) हा पर्याय निवडा.
- 'पेमेंट' पर्याय निवडा: त्यानंतर 'पेमेंट' (Payment) या पर्यायावर क्लिक करा.
- नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा: पुढील रकान्यात तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) टाका आणि कॅप्चा कोड भरून 'सबमिट' (Submit) करा.
FTO ची माहिती: सबमिट केल्यानंतर पुढील विंडोमध्ये FTO ची संपूर्ण माहिती दिसेल. जर तुमचा FTO जनरेट झाला असेल, तर ते स्पष्टपणे दाखवले जाईल. ज्या शेतकऱ्यांचा FTO अजून तयार झालेला नाही, त्यांना जुनेच हप्ते दिसतील. नवीन हप्त्यांसाठी FTO तयार न झाल्यास, त्या शेतकऱ्याला हप्ता मिळणार नाही किंवा ते अपात्र ठरले आहेत असे समजावे.












Click it and Unblock the Notifications