Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Namo Shetkari Yojana : 91 शेतकऱ्यांसाठी खूशखबर! बँक खाते तपासा, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वितरीत

Namo Shetkari Yojana 2025 : राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'नमो शेतकरी महासन्मान किसान योजने'चा सातवा हप्ता आज वितरित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात आयोजित एका कार्यक्रमात हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. या हप्त्यामुळे ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांना एकूण १८९२.६१ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्यात आला. यावेळी,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे,मुख्य सचिव राजेशकुमार यासह मंत्रीमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

Namo Shetkari Yojana 2025 7th installment distributed

नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता निधी वितरित करण्यासाठी एकूण १९३२. ७२ कोटी रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत ९२ लाख ३६ हजार शेतक-यांना लाभ होणार आहे.आज सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल ते जुलै २०२५ या महिन्यांचे अनुदान लाभार्थ्यांना भेटणार आहे.

काय आहे 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना'?

  • केंद्र सरकारच्या 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने'च्या धर्तीवर ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना एकत्रितपणे प्रतिवर्षी १२ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते.
  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: यातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपये मिळतात.
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना: यात राज्य सरकार आणखी ६,००० रुपये जोडते, ज्यामुळे शेतकऱ्यांना एकूण १२,००० रुपयांची मदत मिळते.
  • या योजनेचा सातवा हप्ता एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या महिन्यांसाठी असून, तो अशा शेतकऱ्यांना दिला जातो, जे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. आतापर्यंत या योजनेतून एकूण सहा हप्ते वितरित झाले आहेत. या सहा हप्त्यांमध्ये ९३ लाख ९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ११ हजार १३० कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. सातव्या हप्त्याच्या वितरणानंतर लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढणार आहे.

हेही वाचा : GST दर कपातीमुळे 'या' कंपन्याच्या महागड्या कार मिळणार स्वस्त! बुलेट किती रुपयांनी स्वस्त होणार? वाचा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+