Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

GST दर कपातीमुळे 'या' कंपन्याच्या महागड्या कार मिळणार स्वस्त! बुलेट किती रुपयांनी स्वस्त होणार? वाचा

GST tax cut brings down prices of Maruti Suzuki Tata Motors BMW cars : केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये केलेल्या कपातीमुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. जीएसटी परिषदेने कर दर कमी करून १८ टक्क्यांपर्यंत आणल्यामुळे, टाटा मोटर्स, महिंद्रा, रेनॉल्ट, बीएमडब्ल्यू आणि टोयोटा यांसारख्या प्रमुख कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

GST tax cut brings down prices of Maruti Suzuki Tata Motors

कोणत्या गाड्या किती रुपयांनी स्वस्त होणार?

टाटा मोटर्स : कंपनीने त्यांच्या प्रवासी वाहनांच्या किमती ७५,००० रुपयांपासून ते १.४५ लाख रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. या किमती २२ सप्टेंबरपासून लागू होतील.

महिंद्रा अँड महिंद्रा : महिंद्राच्या प्रवासी वाहनांच्या किमती १.५६ लाख रुपयांपर्यंत कमी होणार आहेत. ही कपात केवळ ICE (अंतर्गत ज्वलन इंजिन) मॉडेल्सवर लागू होईल, इलेक्ट्रिक वाहनांवर नाही.

रेनॉल्ट इंडिया : रेनॉल्टच्या कारच्या किमती ९६,३९५ रुपयांपर्यंत कमी होतील. हे दर २२ सप्टेंबर २०२५ पासून डिलिव्हरी होणाऱ्या सर्व वाहनांवर लागू होतील.

बीएमडब्ल्यू : लक्झरी कार निर्माता बीएमडब्ल्यूनेही आपल्या मॉडेल्सच्या किमती कमी केल्या आहेत. बीएमडब्ल्यूच्या प्रमुख X7 एसयूव्हीची किंमत आता ९ लाख रुपयांनी कमी झाली आहे. ऑडी आणि मर्सिडीज-बेंझसारख्या लक्झरी कार सेगमेंटमध्येही ८-१० टक्क्यांनी कपात होण्याची शक्यता आहे.

मारुती सुझुकी इंडिया : मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर.सी. भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्टो कारची किंमत ४०,०००-५०,००० रुपयांनी, तर वॅगन आरची किंमत ६०,०००-६७,००० रुपयांनी कमी होऊ शकते. मात्र, याबद्दल अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.

फॉर्च्युनर : ३.४९ लाख रुपयांपर्यंत स्वस्त.

फॉर्च्युनर लेजेंडर : ३.३४ लाख रुपयांनी स्वस्त.

हिलक्स : २.५३ लाख रुपयांनी स्वस्त.

वेलफायर : २.७८ लाख रुपयांनी स्वस्त.

इनोव्हा क्रिस्टा : १.८१ लाख रुपयांनी स्वस्त.

इनोव्हा हायक्रॉस : १.१६ लाख रुपयांनी स्वस्त.

कॅमरी हायब्रिड: १ लाख रुपयांहून अधिक स्वस्त.

ग्लान्झा : ८५,३०० रुपयांपर्यंत स्वस्त.

अर्बन क्रूझर टायसर : १.११ लाख रुपयांपर्यंत स्वस्त.

रुमियन : ४८,७०० रुपयांपर्यंत स्वस्त.

अर्बन क्रूझर हायडर: ६५,४०० रुपयांनी स्वस्त.

जीएसटी कपातीनंतर बुलेट किती रुपयांनी स्वस्त मिळेल?

जीएसटी कपातीनंतर राॅयल एनफील्ड बुलेट - ३५० ला ३४९ सीसी इंजिन असते. बुलेट ३५० ची शो रुम किंमत १ लाख ७६ हजार रुपये आहे. २२ सप्टेंबरच्या आत या गाडीवर २८ टक्के जीएसटी आहे, यानंतर पुढे जीएसटी १० टक्के कमी होणार आहे. त्यामुळे सध्याच्या किमतीपेक्षा १० टक्क्यांनी कमी किमतीत बुलेट मिळेल. ही गाडी २२ सप्टेंबरनंतर खरेदी केल्यास १७ हजार ६६३ रुपये वाचणार आहेत. म्हणजेच ढोबळपणे १ लाख ५८ हजार ३३७ रुपयांना मिळेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+