Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शंभराहून अधिक शस्त्रधारी घुसले, कुऱ्हाडीने माझ्यावर वार, जखमी डीसीपींनी सांगितला नागपूरातील थरार

Nagpur News : नागपूर शहरात सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास दोन गट आमनेसामने आले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या घटनेतील हिंसाचार करणाऱ्यांनी डीसीपी निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने वार केल्याने ते जखमी झाले. या संंपूर्ण घटनेचा थरार त्यांनी आज माघ्यमांशी बोलताना सांगितला. त्याचबरोबर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले.

देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा

डीसीपी कदम यांनी सांगितले की, जमावाने दगडफेक केली आणि वाहनांची तोडफोड केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही समाजकंटक शस्त्रे घेऊन फिरताना दिसत आहेत. लवकरच आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीसीपी कदम यांच्याशी फोनवरून बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आणि पोलिसांचे कौतुक केल्याचे डीसीपींनी सांगितले.

Nagpur News

डीसीपी निकेतन कदमांनी सांगितली आपबीती

नागपूरमधील हिंसाचाराच्या प्रकरणात डीसीपी निकेतन कदम यांनी घटनेचे गांभीर्य सविस्तरपणे सांगितले. काल घडलेल्या घटनेत डीसीपी कदम यांच्या हाताला दुखापत झाली. घटनेची माहिती देताना ते म्हणाले की, एका मोठ्या गटाने अचानक एका विशिष्ट भागात हिंसाचार पसरवला.

सामोरे गेल्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता

डीसीपी म्हणाले, "जमाव खूप मोठा होता. यानंतर दगडफेक सुरू झाली आणि वाहनांचे नुकसान झाले. आमच्याकडे अनेक सीसीटीव्ही फुटेज आहेत, ज्यात काही असााजिक घटक शस्त्रे घेऊन फिरताना दिसत आहेत. दगडफेकीत अनेक अधिकारी जखमी झाल्याचे डीसीपी कदम यांनी सांगितले. ते म्हणाले की, अचानक दुसऱ्या रस्त्यावरून शंभरहून अधिक लोकांचा जमाव आला. त्यांच्याकडे शस्त्रे, पेट्रोल आणि काठ्या होत्या. माझी टीम तिथे होती, म्हणून माझी स्वाभाविक प्रतिक्रिया अशी होती की त्यांना थांबवावे किंवा मागे ढकलावे, अन्यथा काहीही घडले असते.

'माझ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला'

डीसीपी म्हणाले, "मी पुढे गेलो आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. गर्दीतील काही लोक मागे हटले पण त्यापैकी एकाने माझ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला, ज्यामुळे माझ्या हाताला खोल दुखापत झाली, परंतु सुदैवाने आमच्या टीममधील इतर कोणत्याही सदस्याला दुखापत झाली नाही."

आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल!

लवकरच आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही डीसीपी कदम यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन करून माझ्या तब्येतीची विचारपूस केली आणि संपूर्ण नागपूर पोलिसांचे कौतुक केले. यामुळे नागपूर पोलिसांचा आत्मविश्वास निश्चितच वाढेल आणि आम्ही भविष्यातही त्याच धाडसाने काम करत राहू."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+