Nagpur Blast news: नागपूर हादरले! SBL कंपनीत भीषण स्फोट! 15 कामगार जागीच ठार; रक्ताचा सडा अन् आक्रोश
Nagpur sbl energy company blast news : नागपूर जिल्ह्याला आज सकाळी एका भीषण आवाजाने हादरवून सोडले. काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'SBL एनर्जी लिमिटेड' या स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत सकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या महाभयंकर स्फोटात १५ कामगारांचा मृत्यू झाला असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आणि नातेवाईकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश यामुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.

(फोटो - AI)
नेमकं काय घडलं?
एएनआय (ANI) आणि नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊळगाव येथील या कंपनीत बारुद आणि डेटोनेटर बनवण्याचे काम सुरू असताना अचानक भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका तीव्र होता की त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर कंपनीच्या परिसरात मोठी आग लागली असून धुराचे लोट आकाशात दिसत आहेत.
बचावकार्य आणि मृतांची संख्या
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, १८ पैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नागपूर ग्रामीण एसपींनी १५ मृत्यूंची अधिकृत दुजोरा दिला आहे.
#WATCH | Nagpur, Maharashtra | 15 people died, 18 critically injured after an explosion at SBL Energy Limited in Nagpur: Harssh Poddar, SP, Nagpur Rural
— ANI (@ANI) March 1, 2026
NDRF team is also present here. pic.twitter.com/WatYhpXNyM
आमदारांचा गंभीर आरोप: 'सुरक्षिततेचे तीन तेरा'
काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेत कंपनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. "कंपनीने सुरक्षिततेच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. कामगारांना कोणतेही प्रशिक्षण न देता आणि आवश्यक काळजी न घेता कामावर राबवून घेतले जात होते," असा आरोप त्यांनी केला. या निष्पाप जीवांच्या मृत्यूला कंपनीचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जुन्या जखमा पुन्हा ताज्या
विशेष म्हणजे, राऊळगाव शिवारातच वर्षभरापूर्वी 'एशियन फायर वर्क्स' कंपनीतही असाच भीषण स्फोट झाला होता. वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications