नागपुरात मोठा ड्रामा! उमेदवारी मागे घेण्यासाठी जाणाऱ्या उमेदवाराला घरात कोंडलं! वाचा काय आहे प्रकरण?

Nagpur election drama kisan gawande independent candidate locked : महापालिका निवडणुकीच्या रणांगणात सध्या बंडखोरी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नागपूरच्या प्रभाग क्रमांक १३ (ड) मध्ये आज एक धक्कादायक प्रकार समोर आला. भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार किसन गावडे यांना चक्क स्थानिक नागरिकांनी त्यांच्या घरातच बंद केले. गावडेंनी आपली उमेदवारी मागे घेऊ नये, यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी आणि रहिवाशांनी त्यांच्या घरावर ठिय्या मांडला आहे.

Nagpur election drama

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने आधी किसन गावडे यांना अधिकृत 'एबी' (AB) फॉर्म दिला होता. मात्र, ऐनवेळी काही राजकीय गणिते बदलल्याने पक्षाने त्यांचा एबी फॉर्म रद्द केला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गावडेंनी प्रभागातून अपक्ष म्हणून शड्डू ठोकला आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून गावडेंवर अर्ज मागे घेण्यासाठी मोठा दबाव टाकला जात होता. पक्षनिष्ठेखातर गावडे आज आपला अर्ज मागे घेण्यासाठी घराबाहेर पडणार होते, याची कुणकुण प्रभागातील नागरिकांना लागली.

नागपूरकरांचा 'घरबंद' पवित्रा

किसन गावडे अर्ज मागे घेण्यासाठी जात असतानाच, प्रभाग १३ मधील शेकडो नागरिक त्यांच्या घरासमोर जमा झाले. "आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही अर्ज मागे घेऊ नका," अशा घोषणा देत नागरिकांनी गावडेंना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव केला आणि त्यांना घरातच बंद (Lock) केले.

"आम्हाला पक्ष नाही, तर आमचा हक्काचा उमेदवार हवा आहे," अशी भूमिका घेत नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून, भाजपच्या स्थानिक नेत्यांची धाकधूक वाढली आहे.

भाजपसमोर पेच

गावडेंना मिळणारा हा जनपाठिंबा पाहता भाजपच्या अधिकृत उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची मुदत असल्याने, आता गावडे नागरिकांच्या विनंतीला मान देऊन लढत कायम ठेवतात की पक्षश्रेष्ठींच्या दबावापुढे झुकतात, याकडे संपूर्ण नागपूरचे लक्ष लागले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+