Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महापालिका निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची खेळी! भाजपच्या विरोधकांसोबत मिळवला हात!

Municipal Corporation Election 2025 : मुंबईच्या उल्हासनगर येथील राजकीय दृष्ट्या बलाढ्य असलेले परिवारांशी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने युती जाहीर केली आहे. गेल्या 35 वर्षांपासून राजकारणात हा परिवार असून त्यांचा उल्हासनगरमध्ये चांगलाच दबदबा आहे. विशेष म्हणजे या परिवाराची आतापर्यंतची लढत भाजपच्या उमेदवारांशी झालेली आहे, आणि कधी यश तर कधी पराभव असा सामना उभयंतात झाला आहे.

एकीकडे एकनाथ शिंदे यांचा पक्ष असलेला शिवसेना हा भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यासोबत सत्तेत आहे, तर भाजपविरोधात गेल्या काही काळांपासून लढणारा उल्हासनगर येथील पप्पू कलानी यांचे पूत्र ओमी कलानी यांनी शिवसेनेला पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता उल्हासनगरच्या महानगर पालिका निवडणुकीत रंगत येणार आहे.

Municipal Corporation Election 2025

एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी यांनी शिवसेना नेते तथा एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकी संदर्भात शिवसेनेला समर्थनार्थ आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

Take a Poll

एकीकडे शिवसेनेला पप्पू कलाने यांच्या पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्यानंतर दुसरीकडे भाजपनेही उल्हासनगर महापालिकेत निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे, सध्या उल्हासनगर येथे भाजपचे आमदार आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिका निवडणुकी संदर्भात मोठी मोठ्या संघर्ष होईल अशी चिन्हे आहेत असे बोलले जात आहे.

पप्पू कलानी यांचा उल्हासनगरमध्ये दबदबा

  • पप्पू कलानी यांचा उल्हासनगरच्या राजकारणात चांगलाच दबदबा आहे. 1990 मध्ये पहिल्यांदा पप्पू कलानी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर उल्हासनगरमध्ये विजय मिळवला होता, त्यानंतर 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडून आले होते.
  • 2004 मध्येही झालेले निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली आणि विजय प्राप्त केला. या चारही निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवाराला पराभूत केले होते.
  • 2009 च्या निवडणुकीत पप्पू कलानी यांना हार पत्करावी लागली होती. तिथे त्यांना भाजपच्या उमेदवाराने हरवले होते.
  • 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत पप्पू कलानी यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली होती.
  • 2019 मध्ये पप्पू कलानी यांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला होता, भाजपच्या उमेदवारांनी त्यावेळी त्यांचा पराभव केला तर 2024 च्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी यांना तिकीट देण्यात आले होते, मात्र भाजपचे उमेदवार आयलानी कुमार उत्तमचंद यांनी त्यांचा पराभव केला होता, आयलानी कुमार उत्तमचंद यांना 82 हजारांवर तर ओमी कलानी यांना 51 हजार 477 मतं मिळाली होती.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+