मुंबईकरांना 268 AC लोकल मिळणार; भाडेही साधेच! सरकारचे पुणे, ठाणे नागपूरकरांसाठी 5 धडाकेबाज निर्णय
Mumbai will get 268 AC local trains : मुंबईतील प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेअंतर्गत 268 पूर्ण एसी लोकल गाड्या मुंबईच्या प्रवाशांना मिळणार आहे. खास बाब म्हणजे एसीमधून प्रवास करतानाही लोकल ट्रेनचेच साधे भाडे असेल आणि मेट्रोसारखेच स्वंयचलित दरवाजे आणि आधुनिक सोई-सुविधा असणार आहेत.

268 लोकल एसी ट्रेन खरेदी करण्यास मान्यता मिळाल्यानंतर आता मुंबईकरांचा लटकणारा प्रवासाला काहीसा दिलासा मिळणार आहे. या या गाड्या मेट्रोप्रमाणेच स्वयंचलित दरवाजासह असल्याने अपघाताची शक्यताही मावळणार आहे. या मोठ्या निर्णयासह देवेंद्र फडणवीस सरकारचे पुणे, ठाणे नागपूरकरांसाठीही धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. त्यात वेगवान वाहतुकीसाठी मोठे निर्णय घेतले आहे.
From Local Trains to Ring Roads: Infrastructure that Serves the People!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2025
Chaired a meeting of the Cabinet Committee on Infrastructure in Mumbai, today, where several key decisions were taken that will directly touch the lives of people across the State. Cities like Mumbai, Pune,… https://t.co/dKefDoBLkx
1. पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे सक्षमीकरण
पुणे आणि लोणावळा दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे हा कॉरिडॉर अधिक सक्षम होईल आणि औद्योगिक व व्यावसायिक विकासाला चालना मिळेल.
2. पुणे मेट्रोचा विस्तार
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात बालाजीनगर-बिबवेवाडी आणि स्वारगेट-कात्रज या दोन नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामुळे शहराच्या मेट्रो जाळ्याचा विस्तार होईल.
3. मुंबई एसी लोकल ट्रेन खरेदी
मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेअंतर्गत 268 पूर्ण एसी लोकल गाड्या खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. या गाड्या मेट्रोप्रमाणेच स्वयंचलित दरवाजे, आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असतील. विशेष म्हणजे, या गाड्यांसाठी तिकीट दरात कोणताही बदल होणार नाही.
4. ठाणे-नवी मुंबईला जोडणारा एलिव्हेटेड रोड
ठाणे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान 25 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रोड उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ठाणे आणि नवी मुंबईमधील दळणवळण जलद होईल.
5. मुंबईत भूमिगत मेट्रो
मुंबईसाठी महत्त्वाचा असलेला वडाळा डेपो ते गेटवे ऑफ इंडिया या 16 किलोमीटर लांबीच्या पूर्ण भूमिगत मेट्रो मार्गिका 11 ला मान्यता मिळाली आहे. सुमारे 24 हजर कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी 'जायका' संस्थेकडून निधी मिळणार आहे.
6. नागपूरमध्ये नवीन रिंग रोड आणि नवे नगर
नागपूर शहराच्या विकासासाठी नवीन रिंग रोड उभारण्यास आणि शहरात एक नवीन नगर तयार करण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
हेही वाचा : महायुती सरकारचे 4 ऐतिहासिक मंत्रिमंडळ निर्णय!15 हजार पलिसांची पद भरणार; रेशन दुकानदारांना मोठे गिफ्ट
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता! -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?








Click it and Unblock the Notifications