Mumbai Train Accident : मुंबईत अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय!
Mumbai Train Accident : मुंबईमध्ये मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान लोकलमधून पडून पाच प्रवाशांचे जीव गेल्यानंतर रेल्वे बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून या प्रवाशांचा मृत्यू झाला. तर जखमींमध्ये सात पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सकाळी 9.20 वाजताच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. लोकलच्या दरवाजाला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या लोकलला घासले गेले. त्यातून हा भीषण अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नेमकी कशी घडली घटना?
आज सकाळी 9:20 वाजता कसारा ते सीएसएमटी( 8:19 ची लोकल) या फास्ट ट्रेन मधून सुमारे तेरा प्रवासी मुंब्राच्या रेल्वे स्टेशनच्या फास्ट ट्रॅक जवळ लोकल ट्रेनमधून खाली पडल्याची घटना घडली. या घटनेत पाच प्रवाशाचा मृत्यू झाला असून नऊजण जखमी झाले, या जखमी प्रवाशांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर काय घेतला रेल्वेने निर्णय?
मीडिया रिपोर्टनुसार, भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला आहे. ते खालीलप्रमाणे..
- नवीन येणाऱ्या गाड्या या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत असतील.
- 238 एसी लोकल मुंबई सबर्बनसाठी घेतल्या आहेत. ज्या गाड्या घेतल्या आहेत, त्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टिमने येणार आहेत.
- आयसीएफद्वारे एक्झिस्टिंग लोकलला रेट्रो फिकमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावले जाणार आहेत.
- लोकलच्या फुटबोर्डवरून प्रवास करण्याला चाप लावण्यासाठी तसेच पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून आपोआप दरवाजा बंद होणाऱ्या ट्रेन रेल्वेच्या सेवेत असणार आहे.
- तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्लान
- मध्य रेल्वेने कल्याणपासून कसाऱ्यापासून तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्लान केला आहे.
- यासह कल्याणपासून कर्जतपर्यंत तिसऱ्या चौथ्या लाईनचाही प्लान केला आहे. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
- दादर पासून किंवा दिव्यापर्यंत सीएसएमटी पर्यंत पाचव्या सहाव्या लाईनची प्लानिंग करण्यात आली आहे. ही प्लानिंक कुर्ल्यापर्यंत पूर्ण झाली आहे. त्यापुढे जमीन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- 15 डब्ब्यांच्या गाड्या वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आपण सिग्नल सिस्टिम अपडेट केली जाईल
- पायाभूत सुविधा अपडेट केल्यावर लोकलच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार आहे.












Click it and Unblock the Notifications