Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

द हॅबिटॅट क्लब बंद; कुणाल कामरा प्रकरणानंतर शिवसैनिकांनी केली मोडतोड, काय आहे क्लबचा इतिहास?

शिवसेना शिंदे गटाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी केल्यानंतर काॅमेडियन कुणाल कामरा चांगलाच ट्रोल झाला. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कामराने तो वादग्रस्त भाग जेथे शूट केला होता, त्या मुंबईतील द हॅबिटॅटवर हल्ला केला. या स्टुडिओची मोडतोड केली. त्यानंतर द हॅबिटॅटच्या व्यवस्थापनाने हा स्टुडिओ अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.

The Habitat Club closed

काय आहे हॅबिटॅट क्लब

मुंबईतील पंजाबी उद्योगपती बलराज सिंग घई यांनी २०१६ मध्ये हॅबिटॅट क्लबची स्थापना केली. २००९ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन मधून पदवीधर झालेले घई यांना त्यांच्या वडिलांकडून हे ५३ खोल्यांचे हॉटेल वारशाने मिळाले. त्यानंतर त्यांनी येथे लाईव्ह परफॉर्मन्स, जेवण आणि पेये पुरविणे सुरु केले. मुंबईतील कालाकारांना त्यांचा लाईव्ह प्रोग्राम सादर करायला हक्काचं ठिकाण मिळावं, म्हणून त्यांनी द हॅबिटॅटची स्थापना केली. द हॅबिटॅटमध्ये आत्तापर्यंत शेकडो लाईव्ह स्टँड-अप कॉमेडी शो, कविता सत्रे, लाईव्ह संगीत सादरीकरणे आणि इतर कला कार्यक्रमांचे आयोजन झाले आहे.

यापूर्वीही झाला आहे वाद

या क्लबबाबत वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या फेब्रुवारीमध्ये वादात सापडलेल्या इंडियाज गॉट लेटेंटचा भाग त्याच ठिकाणी चित्रित करण्यात आला होता. रणवीर इलाहाबादिया आणि समय रैना सारख्या विविध युट्यूबर्सवर "पालकांच्या लैंगिक संबंधांवर" केलेल्या टिप्पणीबद्दल फौजदारी खटले दाखल करण्यात आले होते, तो भागही येथेच शूट झाला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान मुंबई पोलिसांच्या एका पथकाने परिसराला भेट दिली होती. आता एकनाथ शिंदे यांच्यावरील आपत्तीजनक टिपण्णीनंतर हा क्लब पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

क्लब बंद करण्याचा निर्णय

रेस्टॉरंट कम क्लबने कलाकारांसाठी स्टेज आणि ७० प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. शिवाय येथे रेकॉर्डिंग, पोस्ट-प्रॉडक्शन, मनुष्यबळ सहाय्य आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रमोशनची सुविधा देखील दिली. द हॅबिटॅटच्या इंस्टाग्राम अकाउंटचे ३६० हजार फॉलोअर्स आहेत, तर एक्स अकाउंटचे ३.५ हजार फॉलोअर्स आहेत. मात्र आज शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर द हॅबिटॅटने व्यवस्थापन हा क्लब अनिश्चित काळापर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

क्लबने मागितली माफी

झालेल्या प्रकाराला केवळ सादरकर्ते जबाबदार आहेत, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. असे म्हणत द हॅबिटॅट व्यवस्थापनाने झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली. मात्र तरीही संतप्त शिवसैनिक शांत झाले नाहीत. त्यानंतर क्लबने बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+