मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा डाव, सेंट्रल एजन्सीच्या माहितीनंतर पोलिस अलर्ट मोडवर, चौकाचौकात सुरक्षा

Mumbai Terrirst Attack Alert : दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका आहे, अशी माहिती सेंट्रल एजन्सी यांच्याकडून मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत आणि मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गर्दीची ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून नजर ठेवण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर'मॉक ड्रिल्स'करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे. शहरातील सर्व पोलिस आयुक्तांना त्यांच्या-त्यांच्या झोनमध्ये सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले.

Mumbai Police

एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, पोलिसांनी क्रॉफर्ड मार्केट परिसरात मॉकड्रिल केलं, हा तो परिसर आहे. जिथे मोठी गर्दी होते आणि येथे दोन प्रमुख धार्मिक स्थळं आहेत. आगामी काळात विधानसभा निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही दंगली किंवा गालबोट लागेल, असं काही होऊ नये यासाठी मुंबई पोलिस खबरदारी घेत होते. आता दहशतवाद्यांकडून धोका असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाल्यानंतर आता पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.

पोलिसांकडून 'मॉक ड्रिल'

संभाव्य दहशतवादी धोक्यांबाबत केंद्रीय यंत्रणांनी दिलेल्या सतर्कतेनंतर मुंबई पोलिसांनी मुंबई शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. या अलर्टनंतर धार्मिक स्थळे आणि इतर गर्दीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,"आम्हाला गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर 'मॉक ड्रिल' आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व डीसीपींना त्यांच्या संबंधित झोनमधील सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आलं आहे."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+