उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गुरुवारी एका अज्ञात व्यक्तीने धमकी दिली की एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना अशी धमकी मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
ही धमकी फोन किंवा मोबाईलवरून देण्यात आली नसून अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे दिली आहे. हा ईमेल एका अज्ञात व्यक्तीने गोरेगाव पोलिस, जेजे मार्ग पोलिस स्टेशन, मंत्रालय आणि मुंबईतील इतर दोन ठिकाणी पाठवला आहे. हा ईमेल कोणी आणि कुठून पाठवला याचा तपास पोलीस करत आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. अगदी एक महिन्यापूर्वी सुध्दया शिंदे यांनाही धमकी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एका 27 वर्षीय व्यक्तीला अटक केली होती.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही नेते दिल्लीत आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या शपथविधी सोहळ्यासाठी महायुतीचे तिन्ही नेते एकत्र दिसले. उपमुख्यमंत्री शिंदे आज संध्याकाळी दिल्लीहून मुंबईला पोहोचणार आहेत. यापार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे.












Click it and Unblock the Notifications