Mumbai Rain मुंबईला पावसानं झोडपलं! मध्य पश्चिम अन् हार्बर रेल्वेला जोरदार पावसाचा फटका, हालच हाल

Mumbai red alert heavy rainfall : मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून नोकरदारांचे हालच हाल झाले आहेत, तर दुसरीकडे तिन्ही लोकल मार्गावरील रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक प्रभावित झाली आहे. गेल्या काही दिवसातील हा मोठा पाऊस असून सलग पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे.

Mumbai red alert heavy rainfall

पुर्व-पश्चिम उपनगराला पावसाने झोडपले!

मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम उपनगराला आज सकाळपासून जोरदार पावसानं झोडपून काढलं आहे. शहर आणि उपनगराच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रस्त्यांवरही पाणी साचल्यानं रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे.

मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गाला फटका

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेलाही जोरदार पावसाचा फटका बसला आहे. तीन्ही मार्गावरील रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत. याचा फटका नोकरदारांना आणि रेल्वेच्या प्रवाशांना बसला आहे. सध्याही मुंबईत पाऊस सुरु असून जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे.

अंधेरी सब वे पाणी साचल्याने वाहतुकीसाठी बंद

आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे हाल होत आहेत. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हवामान खात्यानं आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई-उपनगरातील या भागात पावसाचा जोर वाढला

अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे तसंच पूर्व उपनगर भागात पावसाचा जोर वाढला आहे. कोस्टल रोडवरील वाहतूक सुरळीत सुरळीत आहे या रस्त्यावर कुठेही पाणी साचू नये याची मुंबई महापालिका खबरदारी घेत आहे. मुंबईत पावसामुळे भरलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महापालिकेने कर्मचारी तैनात केले आहेत तसंच सर्व पंपिंग स्टेशन कार्यरत असल्याचं पालिकेच्या सूत्रानी सांगितलं.

मुंबईसाठी हवामान विभागाचा मोठा इशारा

मुंबईला झोडपून काढल्यानंतर पुन्हा हवामान विभागाने शहर आणि उपनगरासाठी मोठा इशारा दिला आहे. पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा : पावसाचे ताजे अपडेट, पुढील 48 महत्वाचे राज्यात अतिवृष्टी होणार! मुंबईत ऑरेंज अलर्ट, पुण्यात रेड अलर्ट

रत्नागिरीसाठी रेड अलर्ट, पावसाचा इशारा

हवामान विभागाने आज (१८ ऑगस्ट) रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अ‍ॅलर्ट दिला असून, पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासांत खेड तालुक्यात सर्वाधिक १७० मिलिमीटर पाऊस पडला. संगमेश्वर तालुक्यात १६३.३३ मिमी, दापोलीत १५४ मिमी, चिपळूणमध्ये १४७.११, मंडणगडमध्ये १२४ मिमी, रत्नागिरीत ११९.५५ मिमी, लांज्यात ११६.६६ मिमी, गुहागरमध्ये ११३ मिमी, तर राजापुरात ९९.६२ मिमी पावसाची नोंद झाली.

आज सकाळी नऊ वाजताच्या स्थितीनुसार, खेडमधल्या जगबुडी नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. संगमेश्वरातली शास्त्री आणि राजापुरातली कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर तालुक्यात आरवली ते संगमेश्वर ३३ केव्ही वीजवाहिनी नादुरुस्त झाल्याने काल (१७ ऑगस्ट) रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+