पावसाचे ताजे अपडेट, पुढील 48 महत्वाचे राज्यात अतिवृष्टी होणार! मुंबईत ऑरेंज अलर्ट, पुण्यात रेड अलर्ट
Mumbai rain Orange Alert : राज्यात कालपासून सलग पाऊस सुरु असून रात्रभर आणि आज पहाटे जोरदार पाऊस झाला, हा भिजपाऊस असल्याने शेतीसाठी पुरक पाऊस असून येत्या १९ ऑगस्टपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत पाऊस होणार आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर पुण्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आयएमडीच्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार,सध्या महाराष्ट्रात भारी पाऊस पडत आहे, कोकण भागातील अनेक जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आज असून ठाणे आणि पालघर येथे पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर रत्नागिरीत आज १८ ऑगस्ट रोजीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत ऑरेंज अलर्ट
मुंबईत गेले पाच दिवस सारखा पाऊस पडत असून हवामान विभागाने आजही मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तलावांची पातळी ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे, परंतु भरतीच्या वेळी किनार्याजवळ जाण्यापासून नागरिकांना रोखण्याचा इशारा मुंबई महानगर पालिकेने दिला आहे.
Thunderstorm accompanied with lightning, heavy to very heavy rainfall, gusty winds with speed reaching 30-40 Kmph very likely to occur at isolated places in the districts of Marathwada.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 17, 2025
पुण्याच्या या भागात रेड अलर्ट
पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये आज आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व हलक्याचे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर घाट विभागात काही ठिकाणी खूप जोरदार ते तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने पुणे घाट विभागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणात कसा असेल पाऊस?
आज 18 ऑगस्ट रोजी कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होऊन किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात आज पाऊस कसा असेल?
मध्य महाराष्ट्रात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळ ठिकाणी खूप जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होईल असे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.
मराठवाड्यात आज पावसाची स्थिती कशी राहील?
मराठवाड्यात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट होऊ शकतो.
#imdnagpur #IMD #weatherforecast #weatherreport #nagpur #nagpurnewstoday #nagpurweather #nagpursky #nagpurcity #imdvidarbha #updates2025 #NagpurUpdates #WeatherUpdate #monsoon2025 #monsoonseason #weathernews pic.twitter.com/l0HeBYuAJn
— Regional Meteorological Centre, Nagpur (@imdnagpur) August 17, 2025
विदर्भात पावसाची आज स्थिती कशी असेल?
विदर्भामध्ये बहुजन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून त्वरित ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील गोंदिया, अकोला, भंडारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह वादळ येण्याची शक्यता आहे गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा येथे अनेक ठिकाणी आणि विदर्भातील अमरावती, नागपूर, वाशीम, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने
सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.
का पडत आहे एवढा पाऊस?
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे अरबी समुद्रापर्यंत पूर्व-पश्चिम ट्रफ तयार झाला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्याच्या मध्यापर्यंत पाऊस सुरू राहील, त्यामुळे मुंबईसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications