Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सैफवर हल्ला करणारा आरोपी शोधण्यासाठी मुंबई पोलिस गेले थेट एमपीला; एकास पकडले, आरोपी सापडला?

अभिनेता सैफ अली खानवस हल्ला होऊन आता तीन दिवस होत आले आहेत. मात्र पोलिसांना अद्याप खऱ्या आरोपीला शोधण्याच अपयश आले आहे. सुरुवातीला मुंबईत एका संशयीताला ताब्यात घेतले गेले. त्यानंतर आरोपी गुजरातला पळाल्याचे समोर आले. पोलिसांचं एक पथक तिकडेही गेलं. आता मुंबई पोलिसांचे एक पथक थेट मध्यप्रदेशला गेले असून, तेथेही एका संशयीला ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांचे ३५ पथकं आरोपीच्या शोधात आहेत.

Saif Ali Khan

एमपीतून एकास पकडले

मुंबई पोलिसांनी मध्यप्रदेशातून एकाला घेतलं ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची अधिकृत माहिती पोलिसांनी अद्याप प्रसारमाध्यमांना दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी खरा आरोपी पकडलाय की, आरोपीसारखा दिसणारा संशयीत पकडलाय, हे समजण्यास थोडा वेळ वाट पहावी लागणार आहे. काल पोलिसांनी शाहीद नावाच्या एका तरुणाला पकडलं होतं. सैफवर हल्ला करणाऱ्या सारखाच तो दिसत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. पण चौकशीत तो चोर नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्याला पोलिसांनी सोडून दिलं होतं.

फोटो केला व्हायरल

मुंबई पोलिसांनी आरोपी पकडण्यासाठी आता तपासाचा वेग वाढवला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेवरुन फोटो काढून तो व्हायरल केला आहे. याशिवाय वांद्रे पोलिसांकडून व्हीडीआर यंत्रणेद्वारे तपास सुरु आहे. मुंबई क्राइम ब्रँण्च व स्थानिक गुन्हे शाखा मुंबईतील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. याशिवाय लोकेशन ट्रेस करण्याचे कामही सुरु आहे. येत्या काही तासांत खरा आरोपी पोलिसांना सापडेल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. दरम्यान, एमपीत पकडलेला आरोपीच खरा आहे का, हे अद्याप समोर आलेले नाही.

फिर्याद व जबाब पूर्ण

सैफ अली खानची पत्नी करीना कपूरने या प्रकरणी पोलिसांकडे जबाब नोंदवला. करिनाच्या घरातील नोकरांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत. या जबाबाच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. हा आरोपी दादरला दिसल्याचंही एका सीसीटीव्हीतून समोर आलं आहे. काल त्याचं लोकेशन प्रभादेवी दाखवलं जात होतं. दरम्यान, केअरटेकर एलियाना हिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे पुन्हा बदलली असल्याचे दिसत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+